छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात ५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पेरलेले आयईडी निकामी करत असताना अचानक स्फोट झाला, ज्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले. दरम्यान, जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ सप्टेंबर) विजापूरच्या ताररेम पोलीस स्टेशन हद्दीतील चीन्नागेलूर भागात डिमाइनिंगसाठी गेलेल्या सीआरपीएफच्या १५३ व्या बटालियनच्या जवानांनी नक्षलवाद्यांकडून पेरण्यात आलेल्या आईईडीचा शोध घेतला.
सीआरपीएफची बीडीएस टीम त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान आईईडीला स्फोट झाला. या स्फोटात पाच जवान जखमी झाले. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक उपचारानंतर जखमी सैनिकांना विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिजापुरचे एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले, दुर्घटनेत जखमी झालेल्या जवानांची प्रकृती स्थिर आहे. जखमी जवानांमध्ये संकेत देविदास, संजय कुमार, पवन कल्याण, लच्छन महतो, ढोले राजेंद्र आशुरबा यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ची दशकपूर्ती !
भास्कर जाधव म्हणतात, उद्धव ठाकरे प्रेशर खाली आहेत!
उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री सोडा मंत्री होण्याची सुद्धा क्षमता नाही