29.8 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरविशेषभारत-पाकिस्तान युद्ध झालं तर माधुरी दीक्षित माझी!

भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर माधुरी दीक्षित माझी!

पाकिस्तानच्या मौलानाचे आक्षेपार्ह वक्तव्य

Google News Follow

Related

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारत मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. हल्ल्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानवर कारवाई मागणी देशवासीयांकडून केली जात आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याचे संकेत समोर दिसत आहेत. केंद्र सरकारने देशभरात ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या (७ मे) देशात ‘मॉक ड्रिल’ होणार आहे. अशातच पाकिस्तानच्या मौलवीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी मौलवी आपल्या मुलासोबत दिसून येत आहे. तो म्हणतो, जर पाकिस्तान आणि भारताचे युद्ध झाले तर माधुरी दीक्षित माझी झाली, ठीक आहे. युद्धात पाकिस्तान जिंकेल आणि मी माधुरीला घेवून जाईन.

दरम्यान, या मौलवीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. ही खेदाची आणि लज्जास्पद बाब असल्याचे म्हटले आहे. तर, काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी ‘हे वक्तव्य पाकिस्तानमधील सर्वांचं मत नाही, आणि अशा वक्तव्यांचा निषेध केला पाहिजे’, असं स्पष्ट केलं आहे. यासह अनेकांनी या मौलवीला शिवीगाळ देखील केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा