29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेषसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमणांचे जंगल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमणांचे जंगल

Google News Follow

Related

लॉकडाउनच्या काळामध्ये मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर तसेच अनेक खारफुटीवर भराव घालून घरे बांधण्यात आली. यावर कारवाई होत नसल्याने मजल्यावर मजले चढत जाऊन याचा धोका तिथे राहणाऱ्या नागरिकांना निर्माण होत आहे. तसेच निसर्गाचाही ऱ्हास होत असल्याकडे पर्यावरणप्रेमी मुंबईकर लक्ष वेधत आहेत. खासकरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील अतिक्रमणे गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत. परंतु अजूनही यावर कोणतीही ठोस पावले मात्र उचलली गेली नाहीत.

अतिक्रमणांमुळे जवळपास १०० एकर जमीन गिळंकृत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती सध्याच्या घडीला सर्वच बाजूंनी अतिक्रमाणांचा वेढा आता वाढत आहे. कांदिवलीला दामू नगर, आकुर्ली, पोयसर, ठाण्यातील येऊर, मुलुंडमध्येही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टींचा विस्तार होत आहे.

यासंदर्भात केवळ गुगल अर्थसारख्या माध्यमातून जरी निरीक्षण केले तरी येथील बदल लक्षात येईल. सामान्य माणसांना जो फरक लक्षात येतो तो संबंधित नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी यांना दिसत नाही का? अशी विचारणा आता पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!

शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?

संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत!

राहुलजी, ही टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नव्हे!

बॉम्बे एनव्हायर्नमेंट एक्शन ग्रुप आणि समविचारी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी ही उद्यानातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यावेळी केवळ २०० हेक्टर जमिनीवर अतिक्रमणे होती आता ती जवळपास सर्वच बाजूंनी वाढलेली आहेत.

मुख्य बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने उद्यानाभोवती भिंत उभारण्याची सूचना केली होती. पंरतु याचीही अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते. परंतु अतिक्रमणे हटविण्याची कृती मात्र होताना दिसत नाही. मुख्य म्हणजे इथल्या स्थानिकांकडून वनकर्मचारी वर्गावरही हल्ले करण्याचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे. त्यामुळेच हा मुद्दा आता कधी मार्गी लागतोय याकडेच आता पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा