31 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरविशेषअटल सेतू निर्माणामुळे गर्वाने छाती फुलून येते!

अटल सेतू निर्माणामुळे गर्वाने छाती फुलून येते!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज १२ जानेवारी रोजी मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा सेतूचं लोकार्पण झाले.शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं उदघाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या अटल सेतूमुळे गर्वाने छाती फुगून येते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेत केली. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या अनेक विकास योजना त्यांनी सांगितल्या.देशाचा विकास होईल ही मोदींची गॅरंटी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबई आणि मुंबई उपनगरातून मोठा संख्येने आलेल्या नागरिकांना माझा नमस्कार.आज विकासाचा महोत्सव मुंबईत झाला असला तरी संपूर्ण देशाचे इकडे लक्ष लागून आहे.आज अटल सेतू होत आहेत. भारताच्या विकासासाठी आम्ही समुद्राच्या लाटांना देखील टक्कर देऊ शकतो.आजचा दिवस मुंबई महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्वाचा असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मी सांगितले होते लिहून ठेवा देश बदलणार आणि जरूर बदलणार. ही मोदींची गॅरंटी होती आणि विकास काम पूर्ण करणे ही मोदींची गॅरंटी होती.आमच्या सरकारच्या अगोदर जी व्यवस्था होती त्यांना वर्षानुवर्षे काम लटकवून ठेवण्याची सवय होती.देशातील नागरिकांची त्यांच्याकडून काहीच अपेक्षा उरली न्हवती. लोक हे विचार करत होते की, आम्हाला मरण यायच्या आत हे मोठे प्रकल्प पूर्ण व्हावे,परंतु हे अवघड होते. त्यानंतर मी आलो आणि मी म्हणालो, लिहून ठेवा देश बदलेले आणि जरूर बदलेल. ही मोदींची तेव्हा गॅरंटी होती.आज पुन्हा छत्रपती शवाजी महाराजांना नमन करून, मुंबा देवीला नमन करून, सिद्धिविनायाक मंदिराला नमन करून हा अटल सेतू मुंबईकरांना, देशवासियांना समर्पित करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

कर्नाटक: वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म!

पश्चिम बंगालचे नाव बदला…ममता बॅनर्जी यांची मागणी!

कणां-कणांपासून भारताची भव्य इमारत बनत आहे

कोरोना महामारीच्या संकटानंतर सुद्धा मुंबई-ट्रान्सहार्बर लाईन चे काम पूर्ण होणे ही अत्यंत मोठी गोष्ट आहे.आमच्यासाठी हे सर्व प्रकल्प मीडियाला आणि जनतेला दाखवण्यासाठी होत नाही तर आमच्यासाठी हे सर्व प्रकल्प भारताच्या नवनिर्माणासाठीचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, जेव्हा कणां-कणांपासून इमारत बनली जाते अशाच या सर्व एक-एक प्रकल्पांपासून भारताची भव्य इमारत बनत आहे.आज महाराष्ट्रातील विकासासाठी ३३ हजार करोड रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले आहे.हे प्रकल्प रोड ,रेल्वे, मेट्रो,आणि पाण्यांसारख्या समस्यांशी जोडले गेले आहेत.

राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्याने प्रगती झाली

व्यापाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी आधुनिक भारतरत्नम आणि नेस्ट वन इमारत मुंबईकरांसाठी मिळाली आहे.यामधील अधिक तर प्रोजेक्ट तेव्हा सुरु झाले जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिनचे सरकार आले.हे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे झाले आहे.त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशात-राज्यात अनेक योजना 

महाराष्ट्रातील सर्व माझ्या बहिणींनादेखील शुभेच्या देतो.एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली आणि सर्व माता-बहिणीं आम्हाला आशीर्वाद दिला, याच्यापेक्षा कोणतेही मोठे सौभाग्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी जी मोदी सरकारने गँरंटी दिली आहे, तेच महाराष्ट्राचे सरकार पुढे नेण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान,नारी शक्ती, लेक लाडकी योजना हा असाच त्यातील एक प्रयत्न आहे.

महिलांच्या प्रत्येक समस्येकडे सरकारचे लक्ष

भारताच्या निर्मितीसाठी भारतातील नारी शक्ती पुढे येणे, नेतृत्व करणे हे तेवढेच महत्वाचे आहे.आमच्या सरकारचा अविरत प्रयत्न आहे की, माता-बहिणी आणि मुलींच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांना दूर करणे त्यांचे आयुष्य अधिक सोईस्कर बनवणे.उज्ज्वला योजना अंतरंगात गॅस कनेक्शन असो, आयुष्यमान भारत योजना असो, जनधन बँक खाते असो, पीएम आवास योजने अंतर्गत पक्के घर असो, गरोदर महिलांच्या खात्यावर सहा हजार रुपये पाठवणे असो,
आमच्या सरकारने प्रत्येक महिलांच्या चिंतेकडे लक्ष ठेवले असल्याचे मोदींनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, अनेक दिवसांपासून देशभरात मुंबई-हार्बर लिंक अटल सेतूची चर्चा होत आहे.आज जो कोणी अटल सेतूला बघत आहे, फोटो बघत आहे, त्याला आनंद भरून येथ आहे, तो मंत्रमुग्ध होत आहे त्याची छाती गर्वाने फुगून येत आहे.हा प्रकल्प बनवताना असताना जेवढी केबल लागली आहे, तेवढ्या केबलने पृथ्वीच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.जेवढे स्टील-लोखंडचा वापर झाला आहे तेवढ्यामध्ये चार हावडा ब्रिज तयार झाले असते ,आणि सहा स्टॅचू ऑफ लीबिर्टी बनवले गेले असते,असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

छत्रपती शिवरायांना नमन करून हाती घेतलेले संकल्प पूर्ण होत आहेत
मुंबई ते रायगडला जाताना आता कमी वेळ लागणार आहे. या कामासाठी जपानची मोठी मदत झाली. माझे दिवंगत मित्र, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे स्मरण करत असल्याचे त्यांनी म्हटले. २०१४ च्या निवडणुकी आधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते.आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघत आहे. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. १० वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती मात्र आता प्रकल्पाची चर्चा होत आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा