31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरविशेषभारताचा विजयी चौकार, शतकांची 'विराट' झेप

भारताचा विजयी चौकार, शतकांची ‘विराट’ झेप

वनडेतील ४८वे शतक, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यास सज्ज

Google News Follow

Related

भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील ४८वे वनडे शतक बांगलादेशविरुद्ध ठोकले आणि भारताला वर्ल्डकपमधील आपल्या चौथ्या सामन्यात ७ विकेट्सनी विजय मिळवून दिला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय होता. तर विराटने या सामन्यात केलेल्या ४८व्या शतकामुळे त्याने आता सचिनच्या ४९ वनडे शतकांची बरोबरी करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

 

भारताने बांगलादेशला पराभूत केले आणि विजयाचा चौकार लगावलाच पण गुरुवारचा दिवस विराट कोहलीने गाजविला. त्याने ९७ चेंडूंच्या खेळात ६ चौकार आणि चार षटकारांसह १०३ धावांची खेळी केली.

 

भारताने याआधी, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांना पराभूत केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या या विजयामुळे भारत आता १० संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने सरस धावगतीच्या जोरावर पहिले स्थान मिळविले आहे. त्यांनीही चार सामने जिंकले आहेत.

 

हे ही वाचा:

चहाबिस्किटे देत आजीबाईंचा दहशतवाद्यांशी ‘लढा’

मराठा आरक्षण मिळावे म्हणून जालन्यातील कावळे यांनी मुंबईत घेतला गळफास

इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

 

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लिट्टन दासच्या ६६ धावा आणि दुसरा सलामीवीर तानझिद हसन (५१) यांच्या अर्धशतकांमुळे त्यांनी चांगली सुरुवात केली पण त्यानंतर क्रमाक्रमाने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. महमुदुल्लाने केलेली ४६ धावांची खेळी यामुळे त्यांना ८ बाद २५६ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. या धावसंख्येला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. रोहित शर्मा (४८) आणि शुभमन गिल (५३) यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराटने श्रेयस अय्यरसह ४६ धावांची भागीदारी केली. मात्र विराटने एका टोकाने स्वतःच्या धावाही वाढवत नेल्या आणि भारतालाही जिंकून दिले.

 

विराट २६ हजार धावा

 

२०१५च्या वर्ल्डकपनंतर विराटची ही वर्ल्डकपमधील पहिली शतकी खेळी होती. या वर्ल्डकपमधील आधीच्या तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकाविली आहेत. विराटने ब्रायन लारा, रोहित शर्मा यांनाही वनडे वर्ल्डकपमध्ये मागे टाकले आहे. आता तो वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर (२२७८), रिकी पॉन्टिंग (१७४३) आणि कुमार संगकारा (१५३१) हे त्याच्याआधी आहेत.

त्याशिवाय विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने २६ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सचिन तेंडुलकर (३४३५७), कुमार संगकारा (२८०१६), रिकी पॉन्टिंग (२७४८३) हे त्याच्या आधी असलेले फलंदाज आहेत. विराट आता २६०२६ धावसंख्येवर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा