भाजप नेते सैयद शहनवाझ हुसैन यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले की, “भारत हा आत्मनिर्भर आणि सक्षम देश आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. जगात कोणतीही ताकद भारताच्या आर्थिक प्रगतीला थांबवू शकत नाही. भारत आपल्या हितांचे संरक्षण करण्यास पूर्णतः सक्षम आहे. देशाचे सौभाग्य आहे की आपल्याकडे सक्षम नेते, सक्षम सरकार आणि सक्षम नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पूर्णतः सुरक्षित आहे.”
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जवळ येत आहे. एनडीए आणि इंडि आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडि आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी मैदानात उभे राहिले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन हेच विजयी होतील अशी सर्वत्र चर्चा आहे आणि सत्ताधारी नेत्यांना देखील तेवढा विश्वास आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सैयद शहनवाझ हुसैन म्हणाले, “विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार यांचे मत संपूर्ण देशाला माहिती आहे. म्हणूनच विरोधकांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. सीपी राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उमेदवार आहेत, त्यांना अनुभव आहे, ते खासदार राहिले आहेत. त्यांना उपराष्ट्रपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ते नक्कीच देशाचे पुढचे उपराष्ट्रपती होतील.” दरम्यान, या निवेदनांमधून भाजपने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला असून, आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयाची खात्री व्यक्त केली आहे.
#WATCH | Patna, Bihar: BJP leader Syed Shahnawaz Hussain says, "India is a self-reliant country, a capable country. It has a rapidly growing economy. No power in the world can stop India's economy, and India is capable of protecting its interests and the country is fortunate to… pic.twitter.com/7W4X1W7ln8
— ANI (@ANI) August 26, 2025







