28.4 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरविशेषभारत-कझाकिस्तानचा ‘काजिंद-२०२६’ युद्धसराव

भारत-कझाकिस्तानचा ‘काजिंद-२०२६’ युद्धसराव

दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाईचा सराव

Google News Follow

Related

भारत आणि कझाकिस्तान यांच्यातील संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘काजिंद-२०२६’ संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. कझाकिस्तानमधील ओस्केमेन येथे हा सराव आयोजित करण्यात आला असून, २८ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा सराव ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सरावात भारत आणि कझाकिस्तानचे सैनिक एकत्रितपणे विविध लष्करी मोहिमांचा सराव करत आहेत. दोन्ही देशांच्या जवानांमध्ये युद्धकौशल्य, परस्पर समन्वय आणि संयुक्त कारवाईची क्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

या सरावात भारताकडून सुमारे ६० जवान सहभागी झाले आहेत. त्यात गढवाल रायफल्सच्या जवानांचा समावेश असून, भारतीय हवाई दलाचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. कझाकिस्तानकडूनही जवळपास तेवढ्याच संख्येने सैनिक या सरावात सहभागी झाले आहेत. दहशतवादविरोधी कारवायांवर या सरावात विशेष भर देण्यात आला आहे. डोंगराळ आणि अर्ध-शहरी भागात दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई कशी करायची, संशयित ठिकाणांवर छापे कसे टाकायचे, परिसराला घेराव कसा घालायचा आणि लक्ष्याचा शोध घेऊन कारवाई कशी करायची, याचे प्रशिक्षण जवानांना दिले जात आहे.
हे ही वाचा:
हरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद

फॉर्म ६ बाबत राहुल गांधींच्या आरोपांची संबित पात्रांनी केली पोलखोल

आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी नियमावली

एलॉन मस्क पुन्हा ट्रिलियनियर
आधुनिक युद्धतंत्राचाही या सरावात समावेश करण्यात आला आहे. ड्रोनचा वापर, ड्रोनविरोधी यंत्रणा, हेलिकॉप्टरच्या मदतीने कारवाई आणि हवाई मार्गाने जवानांची हालचाल याचा सराव केला जात आहे. तसेच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत माहितीची देवाणघेवाण, संयुक्त नियोजन आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. दोन्ही देशांचे सैनिक एकत्रितपणे सराव करत असल्याने प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान एकमेकांच्या कार्यपद्धती समजून घेण्यासही मदत होणार आहे.
‘काजिंद-२०२६’ हा केवळ लष्करी सराव नसून भारत आणि कझाकिस्तानमधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. दहशतवाद आणि बदलत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांसाठी परस्पर सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे. या संयुक्त सरावामुळे दोन्ही सैन्यांमध्ये विश्वास आणि समन्वय वाढण्याबरोबरच भविष्यात संयुक्तपणे सुरक्षा मोहिमा राबवण्याची क्षमता अधिक मजबूत होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा