29.6 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेष...आता दिल्लीत आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी नियम

…आता दिल्लीत आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी नियम

दिल्ली पोलिसांचा निर्णय

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आता आंदोलनस्थळी पत्रकारांच्या वार्तांकनावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या गर्दीत ‘स्वतंत्र पत्रकार’ म्हणून अनेकजण सहभागी होत असल्याने त्यांची ओळख, वार्तांकनाची पद्धत आणि पोलिसांच्या हालचालींमध्ये होणारा संभाव्य अडथळा याबाबत दिल्ली पोलिसांनी आता स्पष्ट नियमावली जारी केली आहे.

आंदोलनस्थळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी त्यांच्या संस्थेचे वैध ओळखपत्र किंवा PIB/DIP मान्यताप्राप्त कार्ड सोबत ठेवावे आणि ते कायम स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही नियमावली जारी करताना ‘The story matters, so does how you get it!’ असा संदेश दिला आहे. पत्रकारांची पोलिसांना सहज ओळख पटावी, हा या सूचनांमागील उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आंदोलनाचे वार्तांकन करताना पत्रकारांची उपस्थिती किंवा त्यांच्या हालचालींमुळे पोलिसांच्या कारवाईत अथवा पोलिस कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यात अडथळा निर्माण होऊ नये. तणावपूर्ण परिस्थितीत पत्रकारांनी सुरक्षित आणि योग्य अंतर राखून वार्तांकन व चित्रीकरण करावे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

 याशिवाय पत्रकारांनी स्वतःची ओळख आंदोलनकर्त्यांपासून स्पष्टपणे वेगळी दिसेल अशा पद्धतीने स्थान निश्चित करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. म्हणजेच आंदोलनाच्या गर्दीत मिसळून न जाता स्वतंत्रपणे वार्तांकन करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

हे ही वाचा:

एलॉन मस्क पुन्हा ट्रिलियनियर

ड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

टाटा समूहातील अंतर्गत संघर्ष चिघळला

२१ ऑक्टोबरला खुला होणार जिओचा आयपीओ!

दिल्ली पोलिसांनी ही मार्गदर्शक सूचना अशा वेळी जारी केली आहे, जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानीत आंदोलन सुरू आहे. जंतर-मंतर परिसरातील आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचे आरोप केले होते. या तक्रारी दिल्ली पोलिसांनी क्राइम ब्रँचकडे तपासासाठी पाठवल्या आहेत. दरम्यान, आंदोलनांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गर्दीच्या आणि तणावपूर्ण परिस्थितीत वार्तांकन करताना पत्रकार तसेच पोलिसांच्या हालचालींमध्ये समन्वय राहावा, यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा