33 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरविशेषकवटी फुटल्यानंतरही स्मित माछरने वाचवले विमानप्रवाशांचे प्राण

कवटी फुटल्यानंतरही स्मित माछरने वाचवले विमानप्रवाशांचे प्राण

Google News Follow

Related

तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाला पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर दुखापत झाली होती. विमानाच्या कॉकपिटमध्ये त्यांच्या ओमानी सहवैमानिकाने ‘क्रॅश ऍक्स’ने हल्ला केल्याने त्यांच्या कवटीला फ्रॅक्चर झाले होते. त्या परिस्थितीतही या विमानातील १७० हून अधिक प्रवाशांना वाचविण्याचे काम स्मितने केले.

३८ वर्षीय कॅप्टन स्मित माछर यांनी गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा आतून उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करता आला. त्यांनी सहवैमानिकाला नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली आणि विमान स्थिर करण्यासाठी वैमानिकाला सहकार्य केले.

यानंतर विमानाने सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान कॅप्टन माछर यांच्या कवटीला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले. या दुखापतीमध्ये कवटीचा एक तुकडा आतल्या बाजूला दाबला जातो. सौदी अरेबियात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या कवटीची पुनर्रचना केली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी संयुक्त अरब अमिरातीला नेण्यात आले.

हे ही वाचा:

एलॉन मस्क पुन्हा ट्रिलियनियर

ड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

टाटा समूहातील अंतर्गत संघर्ष चिघळला

२१ ऑक्टोबरला खुला होणार जिओचा आयपीओ!

‘डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर’ ही गंभीर दुखापत मानली जाते. कवटीचा तुटलेला भाग मेंदूच्या दिशेने आत ढकलला गेल्याने मेंदूवर दबाव येऊ शकतो किंवा मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे अशा दुखापतीमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. कॅप्टन माछर यांच्या हात-पायांसह छाती आणि पोटाच्या वरच्या भागालाही दुखापत झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून ते सकारात्मकरीत्या बरे होत असल्याचे यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते.

गेल्या आठवड्यात कॅप्टन मच्छर यांना सौदी अरेबियातून विमानाने अबुधाबी येथे आणण्यात आले. पुढील आणि विशेष वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कॅप्टन माछर यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात त्यांची भेट घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतचे नियमित अपडेट्स कुटुंबीयांना दिले जात आहेत.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधताना कॅप्टन माछर यांनी त्या भीषण प्रसंगाची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, ते जमिनीवर पडलेले असताना त्यांच्यावर हल्ला सुरूच होता. त्याच वेळी १७० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे विमान खाली येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर काहीही झाले तरी विमान वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठरवले.

कॅप्टन माछर यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले, “मी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलो होतो. मात्र, शेवटचा प्रयत्न करून आतून दरवाजा उघडायचा, असे मी स्वतःला सांगितले.”

ते पुढे म्हणाले की, दरवाजा उघडल्यानंतर इतर लोक कॉकपिटमध्ये आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. “मी अर्थातच माझ्या जीवासाठी लढत होतो; पण त्याच वेळी इतर लोकांना मरू द्यायचे नाही, हे मला माहीत होते,” असे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा