31 C
Mumbai
Tuesday, September 26, 2023
घरविशेषभारताची पाकिस्तानवर विक्रमी मात

भारताची पाकिस्तानवर विक्रमी मात

विराट, राहुल, कुलदीप चमकले

Google News Follow

Related

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतासाठी सुपर फोरमधील लढतीचा दिवस हा विक्रमी होता. भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विक्रमी विजय मिळविला. भारताने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या ३५६ धावांना उत्तर देताना पाकिस्तानचा डाव अवघ्या १२८ धावांत आटोपला. प्रथमच भारताने पाकिस्तानावर एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळविला.

 

 

भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले विराट कोहली (नाबाद १२२), के.एल. राहुल (१११) आणि पाच बळी घेणारा कुलदीप यादव (२५ धावांत ५ बळी).

हे ही वाचा:

गणेशमूर्तीवर शिक्का मारू नका !

विराटने सचिनचा विक्रम मोडला

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही सुपर फोरची लढत रविवारीही खेळविली गेली पण पावसामुळे ती अर्धवट राहिली. म्हणून सोमवारी राखीव दिवशी ती खेळविण्यात आली. त्यात विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी केली आणि भारताला ३५६ धावांचे लक्ष्य गाठून दिले. विराटने वनडे क्रिकेटमधील आपले ४७वे शतक ठोकले तर १३ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. त्यामुळे सर्वात वेगवान १३ हजार धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून त्याची नोंद झाली. याआधी हा विक्रम ज्यांच्या नावावर होता त्या सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले.

 

 

या धावसंख्येला उत्तर देताना पाकिस्तानला मात्र फक्त १२८ धावाच करता आल्या. सलामीवीर फखर झमानची २७ धावांची खेळी ही त्यांची सर्वोच्च खेळी ठरली. सुपर फोरमध्ये आता भारताची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा