31 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषतालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत भारताने म्हटले...

तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत भारताने म्हटले…

भारताची अफगाणिस्तानला २१ टन मानवतावादी मदत 

Google News Follow

Related

भारताचे अफगाणिस्तान अधिकाऱ्यांशी संबंध सुरूच आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (५ सप्टेंबर) सांगितले. काबूलमधील तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत भारताच्या भूमिकेबद्दल माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “अफगाणिस्तानातील लोकांशी आमचे जुने संबंध आहेत. आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांच्या आकांक्षा आणि विकासाच्या गरजांना पाठिंबा देत आहोत. आम्ही अफगाण अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत.”

रविवारी रात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात २,२०० हून अधिक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने मंगळवारी भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला २१ टन मानवतावादी मदत पाठवली. या मदतीमध्ये औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि पोषण साहित्य यांचा समावेश आहे.

ही मदत अफगाण नागरिकांवर आलेल्या गंभीर अन्नसंकट, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणींमधून सावरण्यासाठी दिली गेली आहे. भारताने याआधीही अनेक वेळा अफगाण जनतेच्या मदतीसाठी अन्नधान्य, औषधे आणि कोरोना लस अशा स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने ताबा घेतल्यापासून, भारताने अफगाणिस्तानातील सध्याच्या व्यवस्थेला औपचारिक मान्यता दिलेली नाही परंतु काबूलमधील भारतीय दूतावासात तैनात असलेल्या तांत्रिक पथकाद्वारे संपर्क कायम ठेवला आहे. भारताने अफगाणिस्तानातील जनतेला अन्नधान्य आणि औषधे यासह मानवतावादी मदत देखील पुरवली आहे.

हे ही वाचा : 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध लूकआउट नोटीस जारी

पुतिन, जिनपिंग यांच्यासोबतचा मोदींचा फोटो शेअर करत ट्रम्प म्हणाले…

मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार तरुणांसाठी प्रशिक्षणाची संधी!

‘गब्बर सिंग टॅक्स’ म्हणून हिणवणारे आता श्रेय घ्यायला आले!

भारताच्या तालिबानशी वाढत्या संबंधांचे आणखी एक संकेत म्हणून, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या वर्षी जानेवारीमध्ये दुबईमध्ये अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी बैठक घेतली होती. २०२१ मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यापासून, भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जे.पी. सिंह (मिस्री) आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात जानेवारी २०२५ मध्ये झालेली बैठक ही दिल्ली आणि तालिबानमधील आतापर्यंतची सर्वाधिक उच्चस्तरीय संपर्क बैठक होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा