भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये २००७ ते २०२४ दरम्यान एकूण ३२ टी२० सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत फक्त तीनच फलंदाज ५०० धावांचा टप्पा गाठू शकले आहेत. या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शिर्षस्थानी आहे ‘रन मशीन’ विराट कोहली, तर टॉप-५ मध्ये फक्त दोनच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
🔹 १. विराट कोहली
२०१२ ते २०२४ दरम्यान कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ टी२० सामन्यांत ४९.६२ च्या सरासरीने ७९४ धावा ठोकल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून ८ अर्धशतकं आली आहेत.
🔹 २. ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मॅक्सवेलने २०१२ ते २०२४ दरम्यान भारताविरुद्ध २२ टी२० सामने खेळले असून ३१.८८ च्या सरासरीने ५७४ धावा केल्या आहेत. त्याने २ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत.
🔹 ३. आरोन फिंच
२०१२ ते २०२२ दरम्यान फिंचने भारताविरुद्ध १८ टी२० सामन्यांत २७.७७ च्या सरासरीने ५०० धावा केल्या. त्याने २ अर्धशतकी खेळी केल्या असून ६२ चौकार आणि ११ षटकार ठोकले आहेत.
🔹 ४. मॅथ्यू वेड
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज वेडने भारताविरुद्ध १७ टी२० सामन्यांत ३ अर्धशतकांसह ४८८ धावा केल्या आहेत. त्याने टीम इंडियाविरुद्ध ४३ चौकार आणि २० षटकार लगावले असून त्याची सरासरी ५४.२२ आहे.
🔹 ५. रोहित शर्मा
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं २००७ ते २०२४ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८.४७ च्या सरासरीने ४८४ धावा ठोकल्या आहेत. त्याने ४ अर्धशतकं झळकावली आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढील टी२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार असून पहिला सामना कॅनबेरा येथे होईल. त्यानंतरचे सामने मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे होतील.







