27 C
Mumbai
Friday, April 17, 2026
घरविशेषभारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!

भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!

लष्कराची पुष्टी

Google News Follow

Related

शनिवारी (९ ऑगस्ट) बेंगळुरू येथे एअर चीफ मार्शल एलएम कात्रे यांच्या व्याख्यानमाले दरम्यान, भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती सार्वजनिक केली. ७ मे ते १० मे दरम्यान चाललेल्या ऑपरेशनमध्ये, भारताच्या वायु दलाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (सरफेस टू एयर) क्षेपणास्त्र प्रणालीने पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C (एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) / ELINT विमान पाडले. ही भव्य विशेष लष्करी विमानं हवाई देखरेख आणि त्वरित इशारा देण्यासाठी वापरण्यात येतात. ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानाची माहिती भारताने पहिल्यांदाच जाहिर केली आहे.

ते म्हणाले, “आम्ही पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडल्याची पुष्टी केली आहे, जे एकतर ELINT विमान किंवा AEW&C विमान असू शकते, ही सुमारे ३०० किमी अंतरावरून पाडण्यात आली. हे खरोखरच जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या प्रणालीने सर्वात मोठे विमान पाडण्यात आले आहे असं आज आपण बोलू शकतो.”

पाकिस्तानवर केलेल्या या हवाई नुकसानाची माहिती पहिल्यांदाच एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले की, ७ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देण्यापूर्वी सर्व पाकिस्तानी ठिकाणे आणि इमारती ओळखण्यात आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, भारतीय हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाचे सॅटेलाइट प्रतिमांद्वारे मूल्यांकन करण्यात आले होते, ज्यामुळे लक्ष्य अचूकपणे मारल्याची पुष्टी झाली.

एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले, “शहबाज जेकबाबाद विमानतळ हा हल्ला केलेल्या प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. येथे एक एफ-१६ हँगर आहे. या हँगरचा अर्धा भाग नष्ट झाला आहे. आणि मला खात्री आहे की आत काही विमाने होती जी आता खिळखिळी झाली आहेत. मुरीदके आणि चकलाला सारख्या किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटरवर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश आले.”

हे ही वाचा :

रक्षाबंधन दिवशी तिबेटी बहिणींनी मोहन भागवत यांना बांधली राखी

विवान कारुळकरांना IIT पटनाकडून मिळाला ‘उत्कृष्ट साहित्यिक’ पुरस्कार !

‘काकोरी घटने’तील क्रांतिकारांना गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली, काय आहे घटना?

रविचंद्रन अश्विन सीएसकेची साथ सोडण्याची शक्यता

यापूर्वीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या एका निवेदनात त्यांनी ‘पाच’ लढाऊ विमाने पाडल्याची चर्चा केली होती. तरीही ही लढाऊ विमाने कोणत्या छावणीतून पाडण्यात आली हे उघड करण्यात आले नव्हते. दरम्यान एअर मार्शल एपी सिंग यांच्या वक्तव्याने ती कोणती विमाने होती आणि पाकिस्तानी हवाई दलाचे किती मोठे नुकसान झाले याची पुष्टी झाली आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दलाने ७ ते १० मे दरम्यान राबवलेले एक अतिशय यशस्वी ठरलेले लष्करी ऑपरेशन आहे, ज्याचा उद्देश पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या भारतीय पर्यटकांच्या मृत्यूचा बदला घेणे आणि पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालणे हा होता.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांच्या मते, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी या ऑपरेशनमध्ये पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT (एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) विमान पाडले आहेत. या यशामुळे पाकिस्तानच्या हवाई देखरेख आणि आक्रमक क्षमतेचे मोठे नुकसान झालेच नाही तर भारताची सामरिक श्रेष्ठता देखील सिद्ध झाली आहे. ऑपरेशन दरम्यान, भारतीय हवाई दलाने त्यांची तांत्रिक कौशल्ये, अचूक नियोजन आणि जलद प्रतिक्रिया क्षमता दाखवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा