भारतीय स्टार फुटबॉलपटू आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भावूक करणारा एका व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. सुमारे नऊ मिनिटांचा हा व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ६ जून रोजी कुवेत विरुद्धचा फिफा वर्ल्ड कप पात्रता सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. ३९ वर्षीय सुनील छेत्रीने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सोशल मीडियावर सुनील याने एक व्हीडिओ पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. या व्हीडिओमध्ये त्याने आपल्या प्रवासाबद्दल सांगितले असून नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे, असं त्याने म्हटलं आहे. आपल्या या आठवणींबद्दल संगताना त्याने म्हटले की, “मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात लक्षात राहणारा असा क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते.” निवृत्तीबद्दल सांगताना म्हणाला, जेव्हा त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा त्याने सर्वप्रथम आई-वडील आणि पत्नीला याबद्दल सांगितले. निर्णय ऐकून वडील खुश झाले पण आई आणि बायको रडायला लागल्या.
I'd like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
फिफा विश्वचषक २०२६ आणि AFC आशियाई चषक २०२७ साठी प्राथमिक संयुक्त पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यातील कुवेत आणि कतार विरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. दरम्यान सुनील याने निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तो त्याचा शेवटचा सामना ६ जून रोजी कुवेत विरुद्ध खेळणार आहे.
हे ही वाचा:
१४ हजार ५०० फूट उंचीवर मिळणार चीनला सडेतोड उत्तर
मोदींविरोधात उभ्या राहिलेल्या स्टँडअप कॉमेडियन श्याम रंगीलाचा अर्ज फेटाळला
‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी ‘इंडी’ आघाडीला बाहेरून पाठींबा देणार
उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?
सुनील छेत्री याने देशासाठी १५० सामन्यात ९४ गोल केले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीने १२ जून २००५ रोजी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.