31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरराजकारण‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी 'इंडी' आघाडीला बाहेरून पाठींबा देणार

‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी ‘इंडी’ आघाडीला बाहेरून पाठींबा देणार

निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेत अचानक बदल

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर ‘इंडी’ आघाडीचे सरकार केंद्रात आल्यास त्यांचा पक्ष म्हणजेच तृणमूल काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, अशी महत्त्वाची भूमिका ममता यांनी जाहीर केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘इंडी’ आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची युती करत नसल्याचे स्पष्ट करत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आताच्या ममता यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. सुरुवातील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने ‘इंडी’ आघाडीला आपला जाहीर पाठींबा जाहीर केलेला. पण ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतच ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीसोबत काडीमोड घेत, पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली होती.

जागा वाटपावरून झालेल्या वादामुळे ही भूमिका त्यांनी घेतल्याचे बोलले जात होते. शिवाय त्यांनी काँग्रेसवर उघडपणे काही आरोपही केले होते. ममता बॅनर्जी यांनी ‘इंडी’ आघाडीत काँग्रेससोबतच्या जागावाटपावर असहमती दर्शवली होती. तसेच त्या म्हणाल्या होत्या की, “इंडी आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. विरोधी पक्षांच्या युतीचे नावंही मीच दिलेले होते. पण पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेस भाजपसाठी काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला बाहेरून पाठींबा देणार असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?

राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!

‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’

घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात

दरम्यान, ममता बॅनर्जींनी भाजपावर टीका करत म्हटले की हा चोरांनी भरलेला पक्ष आहे. ४०० पार करण्याचं निवडणूक लक्ष्य गाठण्यात भाजपा अपयशी ठरेल, असंही त्या म्हणाल्या. तसेच केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आणि सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इंडी आघाडीला बाहेरून पाठिंबा देऊ. बंगालमधील आमच्या माता-भगिनींना कधीही कोणतीही अडचण येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा