31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले 'ट्रॅप'

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले ‘ट्रॅप’

भारताची पदकांची संख्या पोहोचली २१ वर

Google News Follow

Related

चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक मिळाले आहे. त्यामुळे भारताच्या नेमबाजांनी या स्पर्धेत मिळवलेल्या पदकांची संख्या २१वर पोहोचली आहे.
रविवारी झालेल्या ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत डेरिअस चेनाई, झोरावरसिंग संधू आणि पृथ्वीराज तोन्दाईमन यांनी सांघिक सुवर्णपदक मिळवले. विशेष म्हणजे चेनाई आणि संधू यांनी वैयक्तिक प्रकारातही अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले आहे.

 

 

आतापर्यंत भारताच्या खात्यात सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि पाच ब्राँझ पदके जमा झाली आहेत. या सांघिक स्पर्धेत भारताने ३६२ गुण मिळवत कुवेत आणि चीनला मागे टाकले. कुवेतने ३५२ तर, चीनच्या संघाने ३४६ गुणांची कमाई केली.
महिलांच्या नेमबाजी संघाने रविवारची सुरुवातच रौप्य पदक जिंकून केली. राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती राजक यांनी ट्रॅप नेमबाजीत ३३७ गुण मिळवून दुसरे स्थान काबीज केले. या नेमबाजीत चीनने बाजी मारली.

 

हे ही वाचा:

‘उत्तर प्रदेशमधील चकमकी राज्य-पुरस्कृत नाहीत’

२६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा साथीदार मुफ्ती कैसर फारूक याची हत्या !

मणिपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीला एनआयएकडून अटक

वाघाच्या बदल्यात ‘नखे’!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर नेमबाजांनी उभारी घेतली असून ते कसूर भरून काढत आहेत. माजी जागतिक चॅम्पियन रुद्रांक्ष पाटील आणि ऑलिम्पियन प्रतापसिंह तोमर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३३ नेमबाज यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. ते रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या प्रकारात आपले कसब पणाला लावत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात नेमबाजांनी २१ पदके मिळवून आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

 

 

सरबज्योत सिंगने पात्रता फेरीमध्ये भारताच्या वतीने सर्वाधिक गुण मिळवले आणि पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. तर, १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिलांच्या संघाने रौप्य पदकाची कमाई केली आहे. याआधी ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग आणि शिव नरवाल यांनीही नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. या त्रिकुटाने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये चमकदार कामगिरी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा