30 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषभरारी.. १५,९२० कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण साहित्यांची निर्यात

भरारी.. १५,९२० कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण साहित्यांची निर्यात

गेल्या सहा वर्षांत संरक्षण निर्यातीत दहापट वाढ झाली

Google News Follow

Related

भारताच्या संरक्षण निर्यातीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.२०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १५,९२० कोटी रुपयांची सर्वाधिक लष्करी उपकरणांची निर्यात झाली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. डार्नियर-२२८ विमाने, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, चिलखती वाहने, पिनाका रॉकेट आणि प्रक्षेपक, हलके लढाऊ विमान तेजस, दारुगोळा यांची सर्वाधिक निर्यात झाली असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

गेल्या सहा वर्षांत संरक्षण निर्यातीत दहापट वाढ झाली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १,५२१ कोटी रुपयांची लष्करी उपकरणांची निर्यात झाली होती . २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात १५,९२० कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचली असून देशासाठी ही उल्लेखनीय कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आपली संरक्षण निर्यात झपाट्याने वाढत राहील असे संरक्षणमंत्र्यानी म्हटले आहे.

संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या तपशिलानुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशाची संरक्षण निर्यात १२,८१४ कोटी रुपये होती. भारताने आर्थिक वर्ष 2२०२०-२१ वर्षांमध्ये ८,४३४ कोटी रुपयांची, २०१९-२० मध्ये ९,११५ कोटी रुपयांची आणि२०१८-१९ मध्ये १०,७४५ कोटी रुपयांची लष्करी उपकरणांची निर्यात झाली . २०१६-१७ मध्ये झालेल्या १,५२१ कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ही निर्यात ४,६८२ कोटी रुपयांवर गेल्याचे दिसून येत आहे.

सरकारने संरक्षण निर्यात २०२४-२५ पर्यंत ३५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही वर्षांत, सरकारने देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारतातून ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये लष्करी उपकरणे निर्यात करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

हिंसक घटनांमुळे अमित शहांची सभा रद्द; सासारामला होणार होते भाषण

पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

मालेगावचे उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर गुन्हा

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

संरक्षण निर्यात सर्वकालीन उच्चांक गाठत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.भारताच्या कल्पकतेची आणि मेक इन इंडियाच्या भावनेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे . सरकार भारताला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या निर्यात कामगिरीवर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा