26 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरविशेषकोरियन गेमिंग ऍपचा प्रभाव? तीन बहिणींनी केली आत्महत्या

कोरियन गेमिंग ऍपचा प्रभाव? तीन बहिणींनी केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील धक्कादायक घटना

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत बहिणींचे वय अनुक्रमे १२, १४ आणि १६ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बुधवारी पहाटे सुमारे २ वाजता घडली. बहिणींच्या खोलीत सापडलेली सुसाइड नोट आणि प्राथमिक तपासातून समोर आलेल्या बाबींनंतर टास्क- आधारित कोरियन गेमिंग ऍप तपासाच्या रडारवर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना मोठा आवाज ऐकू आला, त्यानंतर आरडाओरड झाली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, परिसर सुरक्षित केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तिन्ही बहिणींना लोनी येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत बहिणींच्या खोलीतून एक पानाची सुसाइड नोट सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

नोटमध्ये लिहिले आहे की, “एक खरी जीवनकथा. या डायरीत जे काही लिहिले आहे ते सर्व वाचा, कारण ते सगळे खरे आहे. आत्ताच वाचा! मला खूप पश्चाताप आहे. सॉरी बाबा.” खोलीच्या जमिनीवर कुटुंबीयांचे फोटो विखुरलेले आढळून आले. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, तिन्ही बहिणी दीर्घकाळ मोबाईल फोनवर वेळ घालवत होत्या आणि कथितपणे एका कोरियन ऑनलाइन टास्क- आधारित गेमच्या आहारी गेल्या होत्या. मृत मुलींचे वडील चेतन कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांना या गेमबद्दल कोणतीही माहिती नव्हती. ते म्हणाले, “अधिकाऱ्यांनी मला सांगितले की काल शेवटचा टास्क होता.” तसेच त्यांना माहिती देण्यात आली की या गेममध्ये एकूण ५० टास्क होते, ज्यातील अंतिम टास्क म्हणून आत्महत्या होती.

हे ही वाचा:

सोने- चांदी पुन्हा चमकले! चांदीच्या किंमती १६,००० रुपयांनी वाढल्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर खनिजांवर लक्ष

लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान सुरक्षित

पोलिसांच्या माहितीनुसार, “आम्हाला माहिती मिळाली की तीन मुलींनी त्यांच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले. पीडितांना लोनी येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले,” अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुमार सिंह यांनी दिली. डिप्टी कमिश्नर ऑफ पोलिस (डीसीपी) निमिष पाटील यांनी सांगितले की मुली कोरियन संस्कृतीच्या प्रभावाखाली होत्या. कुटुंबीयांनी काही दिवसांसाठी मोबाईल फोन वापरण्यावर निर्बंध घातले होते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र अद्याप कोणत्या विशिष्ट गेम किंवा टास्कची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पोलीस सध्या मुलींचे मोबाईल फोन, डिजिटल हालचाली आणि ऑनलाइन संपर्कांची तपासणी करत आहेत. यासाठी सायबर तज्ज्ञांची मदतही घेतली जाऊ शकते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सध्या आत्महत्येला थेट ऑनलाइन गेमिंगशी जोडता येणार नाही आणि सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा