25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषभारतात १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी, कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही बंदी!

भारतात १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी, कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही बंदी!

चिथावणीखोर भाषण, सुरक्षा दलावर टिप्पणीमुळे कारवाई 

Google News Follow

Related

हानिया आमिर आणि माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे भारतात इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना हे घडले आहे. भारतात ज्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहेत त्यात अली जफर, सनम सईद, बिलाल अब्बास, इकरा अझीझ, इम्रान अब्बास आणि सजल अली यांचा समावेश आहे. दरम्यान, फवाद खान आणि वहाज अली सारख्या काही लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट अजूनही भारतात दिसत आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारताने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर देखील बंदी घातली आहे. भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषण देणे, भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सींवर टिप्पणी करणे, तसेच खोट्या अफवा पसरवणे, अशा विविध आरोपांमुळे या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

सशस्त्र दलांचे मनोबल खच्ची करू नका! सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले

प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवा

अमृतसर: पाकिस्तानी सीमेवर बीएसएफकडून ५ हँडग्रेनेड, ३ पिस्तूलांसह अनेक शस्त्रे जप्त!

पहलगाममध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते दाखल

माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचे युट्यूब चॅनल, ज्याचे ३५ लाखांहून अधिक सबस्क्राइबर होते, ते देखील काढून टाकण्यात आले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर देखील नुकतीच बंदी घालण्यात आली. आफ्रिदीकडून सतत होणाऱ्या विषारी टीकांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

शाहिद आफ्रिदीच्या आधी, शोएब अख्तर, रशीद लतीफ आणि तन्वीर अहमद सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ही कारवाई केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा