33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेषनेटकऱ्याने पोलिसांना विचारले, वाइन पिऊन गाडी चालवू शकतो का?

नेटकऱ्याने पोलिसांना विचारले, वाइन पिऊन गाडी चालवू शकतो का?

Google News Follow

Related

किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध होणार असा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून राज्यात प्रतिभेला फेस आला आहे. अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. असाच एक प्रश्न एका नेटकऱ्याने थेट पोलिसांनाच विचारला आहे. तो म्हणजे, वाईन पिऊन गाडी चालवू शकतो का? त्यावरून बराच धुरळा उडाला आहे.

भाजपाने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून महाविकास आघाडीचे नेते वाईनविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर वाईन आणि दारू यात फरक असतो असे विधान केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही असेच वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा:

भरधाव कार घुसली कंटेनरखाली…पाच जणांनी गमावले प्राण

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन

निवडणुकीसाठी कुणी बायको देतं का बायको!

‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट

 

ते म्हणतात की, “वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. या विधानांवर एका नेटकऱ्याने ट्विटरवर मुंबई पोलिसांना विचारले की, “मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की मला तुरुंगात टाकतील. त्यावर पोलिसांनीही त्याला चटपटीत उत्तर दिले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, सुरुवातीला मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, “सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो.” यासोबतच, “जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल,” असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. एका यूजरने ‘इज्जत से ले जायेंगे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरनेही कमेंट करत मुंबई पोलिसांचे उत्तर बरोबर असल्याचे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा