21.3 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरविशेषमराठी माणसाने फक्त ठाकरेंनाच मते दिली?

मराठी माणसाने फक्त ठाकरेंनाच मते दिली?

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर जी आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार मराठी मते ही फक्त दोन ठाकरे बंधूंनाच मिळाली का, या प्रश्नाचे उत्तर मिळते. उबाठाला मुंबई महानगरपालिकेत ६५ जागी यश मिळाले तर भाजपाला ८९ जागी. मग मराठी माणूस फक्त ठाकरेंच्याच मदतीला आला का, या प्रश्नाचे उत्तर अशा आकडेवारीतच लपले आहे.

या निवडणुकीत मनसेने जवळपास ५२ जागांवर निवडणूक लढविली मात्र त्यांचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले. गेल्यावेळेस त्यांच्या खात्यात ७ नगरसेवक होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला कोणताही मोठा फायदा झाला नाही, हे स्पष्ट झाले. उबाठा शिवसेनेनेही १६७ जागी आपले उमेदवार दिले पण त्यांना ६५ जागी विजय मिळाला म्हणजे १०० ठिकाणी त्यांचे उमेदवार पराभूत झाले. याचा अर्थ मराठी माणसाने केवळ ठाकरे बंधूंनाच साथ दिली असे म्हणता येत नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पराभव राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरी पडणार आहे. बिगेस्ट लूझर हा मनसे पक्ष असेल असे फडणवीस म्हणाले होते. त्यातच मनसेला सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक संतोष धुरी यांनीही असा सवाल उपस्थित केला होता की, राज ठाकरे कधी भाजपाला पाठिंबा देतात, कधी राष्ट्रवादीला साथ देतात, आता ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत या सगळ्यात मनसे या पक्षाचा फायदा होत नाही तर ज्या पक्षांना ते साथ देतात त्यांनाच त्याचा फायदा मिळतो. फडणवीसांनीही हेच सांगितले होते की, मनसेला सर्वात मोठा फटका बसेल पण त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल.

मराठी माणसाने भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस यांनाही साथ दिलेली आहे. २०१७मध्ये शिवसेना ही एकसंध होती. त्यावेळी त्यांना मुंबई महानगरपालिकेत तब्बल ३० टक्के अशी सर्वाधिक मते पडली होती. भाजपाला त्यावेळी २८ टक्के मते पडली. पण आता भाजपाला २१ टक्के मते पडली. यावेळी विभागलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरेंना १३ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २०१७च्या निवडणुकीत ८.५२ टक्के मते मिळाली होती. ती संख्या प्रचंड घसरली असून अवघा १.३७ टक्के इतकीच मते त्याना यावेळी पडली. जर मनसेची तुलना केली तर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम या असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने १.२५ टक्के मते घेतली आहेत. काँग्रेसचाही पुरता हिरमोड झाला असून त्यांनी गेल्या निवडणुकीत १६.६९ टक्के मते घेतली होती ती आता १२ टक्क्यांनी घसरली आणि त्यांना अवघी ४ टक्के मते मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ टक्के मते मिळाली. त्यांनी ९० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यांचे २९ उमेदवार जिंकून आले. समाजवादी पक्षाचाही सुपडा साफ झाला आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत ४.८७ टक्के मते मिळवली होती तर यावेळी त्यांना ०.२८ टक्केच मते मिळाली. मुंबईत ८९ जागा घेऊन भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे मात्र एवढेच नाही तर मतांच्या टक्केवारीतही २१ टक्के मते घेऊन ते त्यातही पहिल्या क्रमांकावर आहेत. मग मराठी मते फक्त ठाकरेंना मिळाले असे खरोखरच म्हणता येईल का? मुंबईत भाजपाच स्ट्राइक रेट ६६ आहे तर उबाठाचा ४०.६२ टक्के. मतांच्या बाबत पाहायचे झाले तर भाजपाला ४५.३९ टक्के मते मिळाली तर उबाठाला २७.३७ टक्के. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १०.२८ टक्के. मग ही टक्केवारी मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का कुणासोबत आहे हेही दर्शवतो असे म्हणता येईल. राज्यात या सगळ्या पक्षांचा स्ट्राइक रेटही दाखवतो की मराठी मते कुणाला मिळाली. जर ही मराठी मते मुंबईपुरती धरली तरी त्यात आघाडीवर भाजपाच आहे. तर राज्यातही त्यांचा स्ट्राइक रेट ६३ टक्के असल्यामुळे तिथेही मराठी माणूस भाजपाच्याच पाठीशी आहे हे दिसते.

 

राज्यात जर या पक्षांचा स्ट्राइक रेट पाहिला तर भाजपाचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक म्हणजे ६३.३८ टक्के इतका आहे. भाजपाने २२०९ उमेदवार राज्यभरात उभे केले आणि त्यांचे १४०० उमेदवार जिंकून आले. गेल्या निवडणुकीत त्यांनी १०९९ उमेदवार जिंकून आणले होते. याचा अर्थ यावेळी त्यांनी ३०० उमेदवार जास्त निवडून आणले. मग हे मराठी मतदाराशिवाय शक्य आहे काय? एकनाथ शिंदेंचे राज्यात १४९३ उमेदवार उभे होते आणि त्यांनी ४१० उमेदवार विजयी केले. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट २७.४६ इतका आहे. पण गेल्या वेळी शिवसेनेला ४८९ उमेदवार जिंकून आणता आले होते. यात उबाठा हा चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यांनी राज्यात १२७५ उमेदवार उभे केले पण त्यांचे अवघे १५५ उमेदवार जिंकले. त्यांचा स्ट्राइक रेट आहे १२.१५. मनसेने ३३० उमेदवार उभे केले पण त्यांचे अवघे १२ उमेदवार जिंकले. त्या तुलनेत गेल्या निवडणुकीत त्यांनी २६ उमेदवार जिंकून आणले होते. त्यांचा स्ट्राइक रेट हा ३.६४ इतकाच आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत उभ्या केलेल्या १३५५ उमेदवारांपैकी १६३ उमेदवार जिंकून आणले त्यांचा स्ट्राइक रेट राहिला १२.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ५३३ उमेदवार उभे केले पण त्यांचे अवघे ३५ उमेदवार जिंकून आले. त्या तुलनेत काँग्रेसने चांगले यश मिळविले. त्यांनी राज्यात १३५१ उमेदवार उभे करून ३५७ उमेदवार जिंकून आणले. अर्थात, उबाठापेक्षा त्यांनी दुप्पट जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राइक रेट होता २६.२७. या सगळ्यात कहर म्हणजे एमआयएम या ओवैसी यांच्या पक्षाने २९.७८ टक्के इतका स्ट्राइक रेट मिळविला.

या सगळ्या टक्केवारी आणि आकडेवारीवरून मराठी माणूस हा फक्त ठाकरे बंधूंनाच मतदान करत नाही, हे पुरेसे स्पष्ट होते. जर महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राइक रेट भाजपाचा आहे, त्यांनी जिंकलेल्या जागा सगळ्यांत सर्वाधिक आहेत शिवाय एकनाथ शिंदे यांनी जिंकलेल्या जागाही दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत आणि त्यांचा स्ट्राइक रेटही बाकी पक्षांपेक्षा सर्वोच्च आहे तर मराठी मते त्यांना मिळालेली नाहीत असे म्हणता येईल का?

आता एक थोडी हृदयस्पर्शी बातमी आपण पाहूया. अत्यंत गरीब घरातून आलेली अनेक तरुण मुले चांगले शिक्षण घेऊन, मेहनत, संघर्ष करून पुढे जात असल्याची असंख्य उदाहरणे असतात. कुडाळमधील गोपाळ सावंत हे असेच एक उदाहरण. त्याची आई कुडाळमधील पिंगुळीत फुटपाथवर भाजी विकते. गोपाळ या त्यांच्या सुपुत्राने केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफमधील नोकरीसाठी मेहनत घेतली आणि त्यात त्याने यश मिळविले. त्यानंतर आईची भेट घेण्यासाठी तो गावात आला. त्याचा भावस्पर्शी व्हीडिओ नंतर व्हायरल झाला.

कुडाळ नगरपंचायत परिसरात गोपाळची आई भाजीविक्रीचा व्यवसाय करते. पती आजारी. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी अनुराधा सावंत यांच्यावर. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांचा सुपुत्र गोपाळने आपल्या प्रयत्नांच्या जोरावर सीआरपीएफसारख्या दलात प्रवेश घेतला आणि त्यानंतर कुडाळला पोहोचल्यावर त्यांच्या भेटीचा तो भावनिक आणि अश्रुंना वाट मोकळी करून देणारा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील शेटकरवाडीत गोपाळ सत्यवान सावंत राहतो. आता तो आईला घर चालविण्यासाठी मदत करणारच आहे पण देशाचाही भार वाहणार आहे.

हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला असून व्हीडिओ पाहताना लोकांचेही डोळे भरून येत आहेत. गुलालाने माखलेला गोपाळ आपल्या आईच्या दिशेने येतो. ती रस्त्यावरच भाजीची पथारी अंथरून बसली आहे. तो आल्यावर तिच्या पायावर पडतो. तिच्या पायावर डोके ठेवतो आणि ती नंतर त्याला मिठीत घेते. दोघेही अश्रुंना वाट मोकळी करून देतात. गोपाळचा मित्र त्या दोघांवरही गुलाल उधळतो. आपल्या आईचे कष्ट कमी करण्यासाठी त्याने केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची ही हृदयस्पर्शी कहाणी होती.

गोपाळ अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेला मुलगा. नोकरीसाठी शोधाशोध करत होता. त्याने अग्निवीरसाठी प्रयत्न केले, पोलिस दलात प्रवेश करण्यासाठी मेहनत घेतली पण त्याला संधी मिळाली नाही. पण त्याने संयम गमावला नाही. उलट कठोर शिस्त, मेहनत, व्यायाम याच्या जोरावर त्याने हे यश मिळविले. परिस्थितीला कधी त्याने दोष दिला नाही. देशसेवेचा विचार त्याने केला होता. त्यासाठी प्रयत्नही केले पण अखेर त्याने सीआरपीएफमध्ये प्रवेश घेतला. गोपाळवर कुडाळ तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा