28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषशिल्पा शेट्टी राहणार राज कुंद्रापासून वेगळी?

शिल्पा शेट्टी राहणार राज कुंद्रापासून वेगळी?

Google News Follow

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी पोलिसांनी अटक केली. राज हा जामिनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. राजच्या या कृत्याचा परिणाम शिल्पा शेट्टीच्या खासगी आयुष्यासोबत व्यावसायिक आयुष्यावरही झाला. या सर्व प्रकरणादरम्यान शिल्पा शेट्टी समाज माध्यमांवरही जास्त सक्रीय नव्हती. साधारण महिनाभर ती तिच्या सुरू असलेल्या कामापासूनही दूर होती. मात्र आता तिने पुन्हा काम सुरू केले आहे. ती पुन्हा एकदा सुपर डान्सर ४ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त झाली आहे.

भविष्यात शिल्पा शेट्टी आपल्या दोन्ही मुलांसोबत राज पासून वेगळे राहण्याच्या तयारीत असल्याचे, शिल्पाच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले आहे. राज कुंद्राचे हे प्रकरण कमी होण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. त्याच्या या कामाबद्दल शिल्पाला काहीच कल्पना नसल्यामुळे ती अजूनही त्या धक्क्यात आहे, असेही त्या व्यक्तीने सांगितले. शिल्पा आपल्या मुलांना पतीच्या या गैरमार्गाने कमावलेल्या पैशांपासून दूर ठेवू इच्छित आहे.

हे ही वाचा:

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

गणेशोत्सव साजरा तरी कसा करायचा ? मंडळांचा सवाल

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

राजच्या संपत्तीतील एक पैसाही तिला नको असून ती सध्या तिच्या चालू असलेल्या कामातून चांगले पैसे कमवते आहे. ‘हंगामा २’ नंतर चित्रपटांसाठी येत असलेल्या संधींवरही ती लक्ष देईल. तिचा ‘निकम्मा’ सिनेमाही लवकरच येईल, असे शिल्पाच्या जवळील व्यक्तीने सांगितले. या सर्व चर्चांबद्दल शिल्पा शेट्टीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा