27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषसिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

Related

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॅरा शूटर सिंहराज अधानानं कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल पी१ प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यासोबतच या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आठवर पोहोचली आहे. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात भारतीय खेळाडूंचं हे आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

असाका शूटिंग रेंजमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिंहराज अधाना आणि चीनच्या लू शीयोलोंग आमने-सामने आले होते. दोघांमध्येही अटी-तटीचा सामना रंगला होता. परंतु, शेवटी सिंहराजनं धमाकेदार खेळी करत २१६.८ अकांसह कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल एसएच१ गटाच्या अंतिम फेरीत सिंगराजनं हे यश मिळवलं. सिंगराजनं २१६.८ गुणांसह हे कांस्यपदक मिळवलं आहे. याच स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल येत भारताचा मनीष नरवालही फायलनमध्ये आला होता. पण तो पदकापासून थोडक्यात हुकला आहे. तर स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदकं चीनच्या नेमबाजांनी मिळवली आहेत.

हे ही वाचा:

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे. अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यासोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं तिसरं पदक निश्चित झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा