26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषअमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!

अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!

पॅलिस्टिनींचे झेंडे फडकवून स्वतंत्र पॅलिस्टाइनची मागणी

Google News Follow

Related

अमेरिकास्थित मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक विद्यार्थी गाझामधील हवाई हल्ल्याचा उल्लेख करून गणिताच्या एका वर्गामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
या विद्यार्थ्याने वर्ग सुरू असतानाच प्राध्यापकाला विचारले की, मी काही बोलू शकतो का? त्यावर या प्राध्यापकाने विचारले, ‘मी ही लाइन पूर्ण करू का?’ त्यानंतर या प्राध्यापकाने परवानगी दिल्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्याजवळील एक कागद घेऊन त्यातील संदेश वाचण्यास सुरुवात केली.

‘तुम्ही गाझामध्ये सुरू असणाऱ्या नरसंहाराकडे या एमआयटीमध्ये मौन राहून पाहात असताना मी शहरभरात वर्गातून बाहेर पडणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत आहे. एमआयटी, इस्रायल आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या नरसंहाराच्या विरोधात पॅलिस्टिनींच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही विद्यार्थी उभे आहोत,’ असा संदेश त्याने वाचला.जगभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी इस्रायल अथवा हमासच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत.

हे ही वाचा.. 

दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

एमआयटीमध्येही एका विद्यार्थ्यांच्या गटाने पॅलिस्टिनींचे झेंडे फडकवून स्वतंत्र पॅलिस्टाइनची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी एमआयटी, इस्रायल आणि अमेरिकेवर नरसंहार कायम ठेवण्याचा आरोप केला. तर, ‘एमआयटीमध्ये शिकणाऱ्या ज्यू आणि इस्रायलच्या विद्यार्थ्यांना हमाससमर्थक आणि इस्रायलविरोधी विद्यार्थ्यांकडून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले,’ असा दावा प्राध्यापक रत्सेफ देवी यांनी केला आहे.अब्जाधीश बिल एकमॅन यांनीही अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल एमआयटीच्या प्रशासनावर टीका केली. तसेच, एमआयटी, हार्वर्ड आणि अन्य विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे बेशिस्त विद्यार्थ्यांवर कारवाई न झाल्यास ज्यूविरोधी कारवायांना प्रोत्साहन मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा