34 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषभारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

१९९५ ते २०२१ दरम्यान भारतात एकूण ३६ हजार ६४० अवयव प्रत्यारोपण

Google News Follow

Related

भारतात अवयव प्रत्यारोपण होणाऱ्या प्रत्येकी पाच रुग्णांमध्ये चार पुरुष तर एका महिलेचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सन १९९५ ते २०२१ दरम्यान भारतात एकूण ३६ हजार ६४० अवयव प्रत्यारोपण झाले, त्यापैकी २९ हजार पुरुष होते. तर, सहा हजार ९४५ महिला होत्या, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. आर्थिक जबाबदाऱ्या, समाजाचा दबाव आणि प्राधान्यांमुळे हे घडत असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्यांचे अवयव रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मेंदूमृत पुरुषदात्यांची संख्या अधिक असली तरी जिवंत दात्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. ‘देशभरातील सर्वाधिक अवयव प्रत्यारोपणांमध्ये ९३ टक्क्यांहून अधिक जिवंत महिलांचा समावेश आहे. त्यामुळेच देशभरातील सर्वाधिक अवयवदात्या या महिला आहेत, हेच यावरून सिद्ध होते,’ असे त्यांनी सांगितले.
एक्पिरिमेंटल अँड क्लिनिकल ट्रान्सप्लांटेशन जर्नल २०२१मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातही ही तफावत ठळकपणे दिसून येते. सन २०१९मधील अवयव प्रत्यारोपणाच्या माहितीचा अभ्यास केला असता, अवयव देणाऱ्या एकूण जिवंत अवयवदात्यांपैकी ८० टक्के महिला होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पत्नी आणि आईचा समावेश होता. तर, अवयव घेणारे बहुतांश जण पुरुष होते.

हे ही वाचा.. 

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

अभ्यासात असेही आढळून आले आहे की, महिलादात्या अधिक असण्याचे कारण म्हणजे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी दाते व्हावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. शिवाय, बहुतेक प्रकरणांमध्ये पुरुष हाच घरातील कर्ता पुरुष असल्याने तो कोणतीही शस्त्रक्रिया करण्यास कचरत नाहीत. पुण्यातील डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटरमध्ये अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमध्ये असणाऱ्या मयुरी बर्वे यांचा याबाबतचा अनुभवही बोलका आहे. गेल्या १५ वर्षांत त्या या क्षेत्रात आहेत. मात्र इतक्या वर्षांत एकदाच एका पतीने त्याच्या बायकोसाठी अवयव दान करण्यासाठी पुढाकार घेतला होता. एरव्ही केवळ पत्नी, आई आणि काहीवेळेला वडीलही अवयवदान करण्यासाठी पुढे येतात, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या मुलासाठी अवयवदान करण्यासाठी आईवडील आनंदाने तयार असतात. जेव्हा दोघेही उपलब्ध नसतात, तेव्हा त्यांच्या पत्नी तयारी दर्शवतात. बरेचदा मुलगी अविवाहित असेल तर ती दाता होते. मात्र पत्नीला अवयवदानाची गरज असेल तर तिचे नाव प्रतीक्षायादीत येते, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘जर अवयव घेणारा पुरुष असेल आणि कुटुंबातील कमावणारी व्यक्ती असेल तर पत्नी किंवा त्याच्या पालकांना त्याच्यासाठी अवयव दान करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांच्यामध्ये असते. मात्र आपल्या कुटुंबीयांकडून अवयव घेण्याची आवश्यकता भासत असेल तर महिलेमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि त्या त्यांच्या कुटुंबीयांकडून अवयव घेण्यास नकार देतात. पुरुषांवर असणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि महिलांनी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, अशी असणारी आपल्याकडील सांस्कृतिक जडणघडण यामुळेही महिला दात्या असण्याचे प्रमाण अधिक होते. तर, सर्वाधिक अवयवप्रत्यारोपण हे पुरुषांमध्ये झाले.

अवयवदात्या पालकांमध्ये मातांचे प्रमाण ७० टक्के
विभागीय ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या संयुक्त संचालक डॉ. अर्पिता चौधरी यांच्याकडे प. बंगाल, बिहार, ओदिशा, झारखंड आणि सिक्कीम या राज्यांचा कार्यभार आहे. अनेक सरकारी रुग्णालयांतील जिवंत दाते आणि जोडीदाराला अवयव दान करण्यासंदर्भातील माहिती बघितल्यास त्यातील ९० टक्क्यांहून अधिक या रुग्णाच्या पत्नी असतात तर, केवळ १० टक्के हे पती असल्याचे उघड झाले आहे. तर, पालकांच्या एकूण अवयवदात्यांचे प्रमाण पाहिल्यास जिवंत दात्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक महिला या आई असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे अवयवदात्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असली तरी अवयव घेणाऱ्यांमध्ये मात्र पुरुषच आघाडीवर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा