25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरविशेषउत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरु

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एका बोगद्याचे बांधकाम सुरु असताना बोगदा कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली ३०-३५ कामगार अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.बचावकार्य पूर्ण होण्यासाठी २-३ दिवस लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF आणि SDRF) टीम आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगावला जोडणारा हा बोगदा आहे.बोगद्याचे बांधकाम सुरु असताना बोगद्याचा आतील भाग अचानक कोसळला.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच मी स्वतः तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.बोगद्यात अडकलेल्यांच्या परतीसाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.

बोगद्याच्या आतील मातीचा ढिगारा कापण्यासाठी उभ्या ड्रिलिंग मशिनची व्यवस्था केली असून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी आतमध्ये ऑक्सिजन पाईप पाठवण्यात आले आहेत.कामगारांना बाहेर काढण्यासाठी २-३ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उत्तरकाशीचे एसपी अर्पण यदुवंशी म्हणाले की, बोगद्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून २०० मीटर आतमध्ये बोगदा कोसळला.

हेही वाचा.. 

एअर इंडियाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवी कोरी विमाने

पंतप्रधान मोदींचे ‘शब्द’ असलेल्या भरड धान्याच्या गाण्याला ग्रॅमीचे नामांकन

सूरत रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

भारत-अमेरिकेने उघडपणे केले इस्रायलचे समर्थन

“बोगद्याच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या एचआयडीसीएलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोगद्यात सुमारे ३६ लोक अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम हजर आहे. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आम्ही लवकरच सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढू,” असे ते म्हणाले.

एसडीआरएफचे कमांडर मणिकांत मिश्रा म्हणाले की, येथील जवान इतर बचाव पथकांच्या समन्वयाने मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करत आहेत.सर्व कामगार सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा