27 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरक्राईमनामाआयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

चार जणांची ओळख पटली

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेल्या सहा जणांना आयसीस या दहशतवादी संघटनेचे काम केल्याप्रकरणी अटक केली आहे. या सहापैकी चार जणांची ओळख पटली असून त्यांची नावे राकिब इनाम, नावेद सिद्दिकी, मोहम्मद नोमन आणि मोहम्मद नाझिम अशी आहेत.

हे सर्व विद्यार्थी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू)शी संबंधित होते आणि या संघटनेच्या बैठकांच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत होते. हे सर्व आरोपी देशभरात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते, असा दावा उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे जाळे विद्यार्थ्यांच्या संघटनेपर्यंत कशाप्रकारे पोहोचले आहे, हेच समोर आले आहे.

हे ही वाचा:

बुलढाण्यातील अपघातात भिक्षुकाचा मृत्यू, पिशवीत सापडले लाखो रुपये

ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली

यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

एसएएमयू या विद्यार्थी संघटनेच्या बैठका आयआयएसचे भरतीचे केंद्र झाल्याचा दावा उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिगढ विद्यापीठातील अन्य विद्यार्थीही एटीएसच्या रडारवर आहेत.
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पुण्यातील आयसिसची टोळी उद्ध्वस्त करून रिझवान आणि शहनवाझ यांना अटक केली होती. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील अनेक विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी अजेंडा राबवत असल्याचे तसेच, आयसिसच्या भारतातील नेटवर्कसाठी काम करत असल्याची कबुली दिल होती. रिझवान आणि शाहनवाझ यांच्या चौकशीनंतरच उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सहा जणांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा