25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरविशेषश्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

श्रीलंकेला नवा झटका

Google News Follow

Related

भ्रष्टाचाराच्या कारणावरून श्रीलंका सरकारने श्रीलंका क्रिकेट मंडळाची हकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ अर्थात आयसीसीनेही या मंडळाचे सदस्यत्व तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची मानहानीकारक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता हा नवा झटका श्रीलंकेला बसला आहे.

श्रीलंका सरकारने ९ नोव्हेंबरला श्रीलंका क्रिकेट मंडळाची हकालपट्टी केल्यानंतर आयसीसीने १० नोव्हेंबरला निवेदन जाहीर करून मंडळाचे सदस्यत्व रद्द केले आहे. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सन १९९६चा विश्वविजेता ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाला नऊ सामन्यांपैकी केवळ दोनच सामन्यांत विजय मिळवता आला आहे. मात्र श्रीलंका संघाची कामगिरी केवळ मैदानावरच ढासळलेली नाही तर एकूणच श्रीलंका क्रिकेट मंडळात आलबेल नाही.

श्रीलंका क्रिकेट मंडळाला भ्रष्टाचाराने पोखरले असल्याचा आरोप करत श्रीलंका सरकारने हे मंडळच बरखास्त करण्याची कारवाई केली. विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात ३०२ धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संपूर्ण क्रिकेट मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय क्रीडा मंत्री रोशन राणासिंघे यांनी घेतला. त्यानंतर मंडळाचे हंगामी अध्यक्ष म्हणून अर्जुन रणतुंगा यांची नियुक्ती करण्यात आली. या मंडळात तीन न्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला होता. ९ नोव्हेंबर रोजी श्रीलंका संसदेत ठराव संमत झाल्यानंतर या मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोघांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर आता आयसीसीने श्रीलंकेचे सदस्यत्व तडकाफडकी रद्द केले आहे.

हे ही वाचा:

मोठे उद्योगपती रोजगार कुठे देतात? छोटे व्यावसायिकच उद्योग देतात!

हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!

पाकिस्तानात दहशतवाद्याला ठोकले

जरांगे वडेट्टीवार जुंपली!

कोणत्याही मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी

आयसीसीचा एक सदस्य म्हणून पाळल्या जाणाऱ्या नियमांचा भंग केल्याचा ठपका श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळावर ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत श्रीलंका सहभागी होऊ शकणार नाही. याची सुरुवात विश्वचषक २०२४ स्पर्धेपासून होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा