28 C
Mumbai
Thursday, November 7, 2024
घरविशेषप्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!

प्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!

प्रभू रामांच्या दर्शनाचा बहुमान माझ्यासाठी सन्मानाची बाब, राजदूत रुवेन अझर

Google News Follow

Related

भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी बुधवारी (१६ ऑक्टोबर) अयोध्येत दाखल होवून प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नीही होती. प्रभू श्री रामांचे दर्शन घेताना तेथील उपस्थित भाविकांसोबत रुवेन अझर यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, इस्रायलने नेहमीच भारताच्या संस्कृतीचा आदर केला आहे. तसेच लोकांना एकमेकांशी जोडण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अयोध्येत येवून प्रभू रामांचे दर्शन घेण्याचा बहुमान मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ते पुढे म्हणाले, येथू येवून आणि दररोज एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना पाहून मी भारावून गेलो आहे.

इस्रायल आणि भारताचे लोक प्राचीन काळापासून एकत्र आहेत. त्यांची संस्कृती, वारसा आणि परंपरा प्राचीन आहेत. जसा आम्हालाही आमच्या वारशाचा अभिमान आहे, तसाच तुम्हालाही तुमच्या वारशाचा अभिमान आहे. इस्रायलचे राजदूत म्हणून आपण येथू येवून देशाचे दर्शन घेणे महत्वाचे आहे. मी माझ्या पत्नीसह या ठिकाणी येवून भारतीय संस्कृती खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला, असे रुवेन अझर यांनी म्हटले.

इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी मंगळवारी (१५ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्वीट करत म्हणाले, भारतातील इस्रायलचे राजदूत रेउवेन अझर यांच्याशी अत्यंत फलदायी आणि अर्थपूर्ण चर्चा झाली. ही बैठक यूपी आणि इस्रायल यांच्यातील परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात खोल बंध मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. आम्ही उत्तर प्रदेशातील लोकांच्या हितासाठी सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यास उत्सुक आहोत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

हे ही वाचा :

लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू

बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई

मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत

मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का? |

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा