31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषपहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे

पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे

Google News Follow

Related

देशामध्ये आता पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधी एका याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. सरन्यायाधीश बोबडे हे २३ एप्रिलला निवृत्त होत आहेत.

महिला न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संबंधित एका प्रकरणावर सरन्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, “महिला वकील या बहुतेक वेळा घरच्या जबाबदारीचे कारण सांगून न्यायाधीश बनण्यास नकार देतात. त्यामुळे आता देशात पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे.” सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याला इतर दोन न्यायमूर्तींनी दुजोरा दिला.

सध्या देशातील उच्च न्यायालयांतील ६६१ न्यायाधीशांपैकी केवळ ७३ न्यायाधीश या महिला आहेत. हे प्रमाण केवळ ११.०४ टक्के इतकं आहे. त्यावरुन महिला वकील असोसिएशनने उच्च न्यायालयात महिला वकिलांची नियुक्ती करावी अशी आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, “केवळ उच्च न्यायालयातच महिलांची नियुक्ती का? भारताची पहिली महिला सरन्यायाधीच्या रुपात महिलेची नियुक्ती का करायची नाही?  कोलॅजियम नेहमी प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर चर्चा करते. त्यामुळे या गोष्टीची आता वेळ आली आहे.”

हे ही वाचा:

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार

सरन्यायाधीश म्हणाले की, “देशात असे अनेक उदाहरणे आहेत की महिला वकिलांनी आपल्या घरच्या, मुलांच्या जबाबदारीचे कारण सांगून न्यायाधीश बनण्यास नकार दिला आहे. पण हे सर्वच महिला वकिलांच्या बाबतीत लागू होत नाही. महिला वकिलांनी न्यायाधीश बनावं या मुद्द्यावर आम्ही याचिकाकर्त्यांशी पूर्ण सहमत आहोत. आम्हालाही तसंच वाटतंय. पण ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने लागू करणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही मोठ्या बदलाची आवश्यकता नाही, केवळ सक्षम उमेदवाराची गरज आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा