भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी राजीनामा सादर केला आहे.
धनखड यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर करत लिहिले –
“आदरणीय राष्ट्रपती महोदया, वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्यसेवा आणि उपचारांना प्राधान्य देण्यासाठी मी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७(अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. आपल्या अथक सहकार्याबद्दल आणि माझ्या कार्यकाळातील उत्कृष्ट संबंधांबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान व मान्यवर मंत्रिमंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पंतप्रधानांचे मार्गदर्शन आणि साथ माझ्यासाठी अतिशय मौल्यवान ठरली. संसद सदस्यांकडून मिळालेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी मी सदैव स्मरणात ठेवेन. उपराष्ट्रपती या पदावरून मला मिळालेला अनुभव माझ्यासाठी अनमोल आहे.”
हेही वाचा:
भूपेश बघेल म्हणाले, आता संपूर्ण देश माझ्या मुलाला ओळखतो!
७/११,दोन प्रश्न…एसीपी विनोद भट यांनी आत्महत्या का केली? १८९ रेल्वे प्रवाशांचा बळी कुणी घेतला?
छोट्या गावातून आला स्विंगचा जादूगार
बांगलादेश वायुदलाचं एफ-७ विमान कोसळलं
धनखड म्हणाले की, “या महत्वपूर्ण कालखंडात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि विकास पाहणे व त्यात सहभागी होणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. देशाच्या इतिहासातील या परिवर्तनशील युगात सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.”
“या प्रतिष्ठित पदावरून निवृत्त होत असताना, भारताच्या जागतिक उत्थानाबद्दल मला अभिमान वाटतो आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा अटळ विश्वास आहे,” असेही त्यांनी म्हटले.







