28.7 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषजग्वार फायटर जेटचा ब्लॅक बॉक्स मिळाला!

जग्वार फायटर जेटचा ब्लॅक बॉक्स मिळाला!

Google News Follow

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात ९ जुलै (बुधवार) रोजी कोसळलेल्या भारतीय वायुसेनेच्या जग्वार फायटर जेटचा ब्लॅक बॉक्स अखेर शोधण्यात यश आले आहे. अपघातानंतर सुरू असलेल्या सततच्या शोधमोहीमेदरम्यान ही मोठी कामगिरी पार पाडण्यात आली आहे. हे जग्वार फायटर जेट चुरू जिल्ह्यातील भानुदा आणि सिकराली रोही गावांमधल्या परिसरात कोसळले होते. अपघातानंतर भारतीय वायुसेनेने मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले होते, ज्यामध्ये दिल्ली, गुजरात आणि सूरतगड एअरबेसमधील टीम्स सहभागी होत्या. स्थानिक प्रशासन आणि वायुसेनेच्या संयुक्त पथकांनी घटनास्थळी दाखल होत कोम्बिंग सर्च ऑपरेशन सुरू केले होते. त्यांनी विमानाच्या पुढील व मागील मार्गावर बारकाईने शोध घेतला आणि अखेर ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळाले.

बुधवार, दुपारी सुमारे १.२५ वाजता रतनगड तहसीलमधील भनोदा गावाजवळ भारतीय वायुसेनेचे जग्वार फायटर जेट कोसळले. या भीषण अपघातात दोन्ही पायलट शहीद झाले. माहितीप्रमाणे हे विमान सूरतगड बेसवरून उड्डाण घेतल्यानंतर भनोदा गावाजवळील शेतामध्ये कोसळले. हे या वर्षातील तिसरे जग्वार विमान अपघात आहे. यापूर्वी २ एप्रिलला गुजरातच्या जामनगरजवळ, तसेच ७ मार्चला अंबालाजवळ वायुसेनेचे डीप पेनिट्रेशन स्ट्राइक एअरक्राफ्ट जग्वार अपघातग्रस्त झाले होते.

हेही वाचा..

भारताचा जीवन विमा उद्योग आता किती टक्क्यांनी वाढणार!

दिल्ली इमारत दुर्घटना : दोन जणांचा मृत्यू

ही तर तालिबानी शिक्षा! नवविवाहित जोडप्याला जोखडात बांधून शेत नांगरले!

आफ्रिकेत कॉलरा, एमपॉक्सचा प्रकोप

सध्या वायुसेनेच्या ताफ्यात सुमारे १२१ जग्वार विमानं आहेत. ही विमाने २०३१ पर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेबाहेर काढण्याची आणि त्यांच्या जागी एचएएल तेजस एमके1ए सारखी आधुनिक विमाने समाविष्ट करण्याची योजना आहे. या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व लष्कराचे अधिकारी घटनास्थळी मदत व बचावकार्य करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा