29.7 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरविशेषभारतावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही!

भारतावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही!

उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केली भूमिका

Google News Follow

Related

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी अमेरिकेच्या थेट हस्तक्षेपाची शक्यता फेटाळून लावली आणि म्हटले की, सध्या सुरू असलेला संघर्ष “अमेरिकेचा विषय नाही”. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, व्हान्स यांनी यावर भर दिला की अमेरिका राजनैतिक मार्गाने तणाव कमी करण्यास प्रोत्साहन देईल, परंतु ते लष्करीदृष्ट्या त्यात सहभागी होणार नाही.

भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्धाबाबत ट्रम्प प्रशासनाला किती चिंता वाटते, असे विचारले असता अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले, आम्ही दोन्ही देशावर नियंत्रण ठेवू शकत नाही. दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आमचे मुलभूत काम नाही, अशा युद्धात आम्ही अडकणार नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा काहीही संबंध नाही.

व्हॅन्स पुढे म्हणाले, “अमेरिका भारतीयांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तानींना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. म्हणून आम्ही राजनैतिक मार्गांनी या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार आहोत”. यावेळी त्यांनी संघर्ष वाढण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, या प्रादेशिक युद्धाचं आण्विक युद्धात रुपांतरित होणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो. सध्या, ते घडेल असे आम्हाला वाटत नाही, असे व्हॅन्स म्हणाले.

हे ही वाचा : 

IPL 2025 : धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द

हिटमॅनचा टेस्ट क्रिकेट प्रवास: रोहित शर्माची संस्मरणीय कारकीर्द

अमृतसर ते जम्मू, पठाणकोट ते भूज पर्यंत पाकिस्तानचे हल्ले उधळून लावणारा ‘सुदर्शन चक्र’

कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड

दरम्यान, पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन भारताने उडवून टाकले आहेत. पाकिस्तानने याला पुढे नेले तर भारत त्याला प्रत्युत्तर देत आहे आणि देत राहील. जर पाकिस्तानने भारतावर असा कोणताही हल्ला केला तर तो स्वतः त्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असेल, असा थेट इशारा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा