26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषकर्नाटकला टाळे!

कर्नाटकला टाळे!

बेंगळुरूमध्ये कॅब, ऑटो , शाळा, महाविद्यालये बंद

Google News Follow

Related

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला राज्याला सोडल्याने कन्नड समर्थक संघटनांनी आज निषेध करत कर्नाटक बंदची हाक दिली.सकाळी ६ वाजल्या पासून कन्नड संघटनांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करत घोषणाबाजीला सुरुवात केली.राज्याच्या विविध भागातून विविध संघटनांच्या ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.समर्थकांकडून ठीक ठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वाहतूक सेवा, हॉटेल आणि इतर सुविधा बंद झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.

राज्याची राजधानी बेंगळुरूसह राज्याच्या विविध भागात निषेध रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. बेंगळुरू आणि मंड्या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत आणि शहरात कलम १४४ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.राज्यभरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व दुकाने, मॉल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. ऑटो आणि टॅक्सी सेवांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहे सुद्धा बंद करण्यात आली आहेत.तसेच कन्नड समर्थक संघटनांनी महामार्ग आणि टोलनाकेही रोखून आंदोलन करत आहेत.निदर्शकांचा एक गट बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला आणि घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्याच्या दक्षिण भागात आज जोरदार निदर्शने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परिस्थिती पाहता बेंगळुरू आणि मंड्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अखत्यारीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.तथापि, बंदमुळे उड्डाण सेवा विस्कळीत झाली असून विमानतळ प्राधिकरणाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २२ येणारी उड्डाणे आणि ४४ बाहेर जाणारी उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) चे प्रवक्ते म्हणाले, “संपूर्ण दिवसभरात सुमारे ४४ उड्डाणे रद्द करण्यात आली, जी दिवसभरातील एकूण फ्लाइट्सच्या ७ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दरम्यान, बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, शहरात बंदला परवानगी दिली जाणार नाही आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.म्हैसूर, कोडागू, मंड्या, चामराजनगर आणि रामनगरासह इतर ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तथापि, बेंगळुरू मेट्रो रेल्वे कार्यरत आहे. राज्य परिवहन विभागानेही राज्य परिवहन महामंडळांना त्यांच्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.बँका, रुग्णालये आणि फार्मसी सुरू राहतील आणि सरकारी कार्यालयेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.कर्नाटक रक्षण वेदिके, कन्नड चालवली (वताल पक्ष) आणि विविध शेतकरी संघटनांच्या गटांसह कन्नड संघटनांसाठी असलेल्या कन्नड ओक्कुटा या संघटनेने राज्यव्यापी बंद पुकारला आहे.कर्नाटक बंदला विरोधी पक्ष भाजप आणि जेडीएस पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा

रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

दरम्यान, तामिळनाडूच्या सीमा असलेल्या कर्नाटकातील जिल्ह्यांना बंदच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.तामिळनाडू पोलिस प्रमुखांनी कृष्णगिरी, धर्मापुरी, सेलम, इरोड आणि निलगिरी या सीमावर्ती जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश दिले. चौक्यांवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण (CWMA) आणि त्याची सहाय्यक संस्था कावेरी जल नियमन समिती (CWRC) च्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडल्याने निषेध करण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कावेरी जल नियमन समितीने १५ ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडूला प्रतिसेकंद ३,००० घनफूट (क्युसेक) पाणी सोडण्याचे निर्देश कर्नाटक राज्याला दिले.समितीने दिलेल्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा