28 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरराजकारण‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची कारवाई  

Google News Follow

Related

बारामती येथील ‘बारामती ऍग्रो’ या प्लांटवर कारवाई करण्यात आली असून यासंबंधी आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवार यांना रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस पाठवत ही कारवाई केली आहे. ७२ तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

रोहित पवार यांनी स्वतः नोटीसीबद्दल ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच हे घाणेरडे राजकारण असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे की, “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

रोहित पवार असंही म्हणाले की, “हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही. आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी

बारामती येथील बारामती ऍग्रो प्लांट हा मोठा प्लांट असून रोहित पवार हे या कारखान्याचे मालक आहेत. शेती संबंधित अनेक माल या ठिकाणी तयार होत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासूंन हा कारखाना वादात सापडला आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने मध्यरात्री २ वाजता रोहित पवार यांना नोटिस पाठवून हा कारखाना बंद करण्याच्या सूचना केल्या आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा