28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषरेल्वे कर्मचारी 'घुसले' मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!

रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!

उत्तर प्रदेशमधील घटनेचे वास्तव आले समोर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होते आणि मोबाईल फोनवर व्यस्त असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या चौकशीत आढळून आले आहे.या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. रेल्वेने तत्काळ प्रभावाने सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला होता.शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली न्हवती. रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात होता.याप्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये उपस्थित पाचही जण मोबाईल फोन वापरत होते आणि मद्यधुंद अवस्थेत होते.

मथुरा रेल्वे स्थानक संचालक संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, चौकशीनंतर पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये लोको पायलटसह ४ तांत्रिक लोकांचा समावेश आहे. घटनेच्या वेळी हे सर्वजण ट्रेनमध्ये उपस्थित होते. त्यानुसार विभागीय कारवाई करण्यात आली असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

हे ही वाचा

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

लोको पायलट गोविंद बिहारी शर्मा आणि तांत्रिक टीमचे हरभजन सिंग, सचिन, ब्रिजेश कुमार आणि कुलदीप या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.याना तत्काळ निलंबित करण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांचे काम ट्रेन लावणे आणि उभी करणे हे होते. हे लोक ट्रेनमध्ये मोबाईल फोन वापरत होते. चाचणी केली असता हे लोक ४२ टक्के नशेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आज संध्याकाळपर्यंत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. त्यानंतर या लोकांनी कोणते औषध प्राशन केले होते हे देखील कळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा