25 C
Mumbai
Monday, December 11, 2023
घरविशेषहरित क्रांतीचे जनक स्वामिनाथन यांची कारकीर्द कशी होती?

हरित क्रांतीचे जनक स्वामिनाथन यांची कारकीर्द कशी होती?

भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा

Google News Follow

Related

हरित क्रांतीचे जनक अशी ओळख असणारे एम. एस. स्वामिनाथन यांचे गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. भारतातील कृषी क्षेत्रात त्यांचे अमुल्य योगदान आहे. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारने त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत केलं आहे.

कशी होती स्वामिनाथन यांची कारकीर्द

डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूतील कुंभकोणम येथे झाला होता. स्वामीनाथन यांचे वडील गांधीवादी आणि स्वदेशीचे पुरस्कर्ते होते शिवाय पेशाने डॉक्टर होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथन यांच्यावर प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. १९४३ मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले. पुढे ते शेती या विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजमधून त्यांनी कृषी क्षेत्रातली पदवी घेतली होती.

कृषीक्षेत्रात काम करायचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. त्यानंतर युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा म्हणजेच युपीएससी देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र, त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली होती. भारत सरकारने स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती.

नेदरलँडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पी‍एचडी केली. त्यानंतर ते मायदेशी परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषी संशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे.

भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. या क्रांतीचे सर्व श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होऊ शकला आहे.

हे ही वाचा

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

कृषी क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल एम. एस. स्वामीनाथन यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. जैविक शास्त्रासाठी त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987 या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
113,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा