32 C
Mumbai
Monday, June 17, 2024
घरविशेषकारूळकर प्रतिष्ठानने राखला निलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना दिलेला शब्द

कारूळकर प्रतिष्ठानने राखला निलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना दिलेला शब्द

Google News Follow

Related

कांदिवलीचा रहिवासी असणारा निलेश तेलगडे याचीही पालघर येथे झालेल्या साधूंच्या मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली. निलेशच्या मृत्यनंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कारूळकर प्रतिष्ठानने मदत दिली. त्यांच्या दोन मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलल्याचे कारूळकर प्रतिष्ठानने जाहीर केले. ऐन लॉकडाउन मध्ये तेलगडे कुटुंबियांच्या घरी जाऊन कारूळकर प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत कारूळकर यांच्या पत्नी शीतल कारूळकर यांनी नीलेश यांच्या पत्नीला रोख मदत दिली. दिलेल्या शब्दाप्रमाणे यावर्षी देखील तेलगडे कुटुंबियांना मदत करण्यात आली. कारूळकर प्रतिष्ठानच्या बोरिवली येथील कार्यालयात शीतल कारूळकर यांनी ही मदत पुजा तेलगडे यांना दिली. पुजा तेलगडे यांच्या दोन्ही मुलींच्या यावर्षीच्या शिक्षणासाठी संपूर्ण मदत त्यांना देण्यात आली.

हे ही वाचा:

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

गेल्या वर्षी पालघर येथे मॉब लिंचिंगची घटना घडल्यानंतर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी नीलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. सरकारकडून देखील त्यांना काही देण्यात आले नाही. असे असताना, आता या प्रकरणाची कुठेही चर्चादेखील नसताना आठवणीने पुजा तेलगडे यांना कारूळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात बोलावून त्यांची विचारपूस करून, त्यांना त्यांच्या मुलींच्या या शैक्षणिक वर्षासाठी मदत देण्यात आली. त्याबरोबरच मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील कारूळकर प्रतिष्ठानने उचलली आहे.

पुजा तेलगडे यांनी सांगितले की, निलेश यांच्या हत्येनंतर कारूळकर प्रतिष्ठानने त्यांना खूप मदत केली. त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कारूळकर प्रतिष्ठानने उचलला. गेल्या वर्षी देखील त्यांना अशाच प्रकारे मदत देण्यात आली होती.

यावेळी पुजा यांनी असे देखील सांगितले की, ‘गेले अकरा महिने आम्हाला कोणी विचारतही नाही. आमच्याशी कोणी संवाद देखील साधला नव्हता ती संधी आम्हाला कारूळकर प्रतिष्ठानमुळे मिळाली.’ त्याबरोबरच त्यांनी ‘माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला त्याचा मृतदेह देखील नीट पाहता आला नाही. त्यानंतर आज आम्ही थोडेबहुत काम करून कसेबसे घर चालवत आहोत. परंतु कोणीही काही विचारत नाही.’ अशी खंत देखील व्यक्त केली. ‘कारूळकर प्रतिष्ठानने आम्हाला बोलावले, विचारपूस केली; आमच्याशी संवाद साधला, याचं आम्हाला फार बरं वाटलं.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा