29 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेषThe kerala story : ३२ हजार महिलांच्या धर्मांतरणाचा आकडा वस्तुस्थितीला धरूनच!

The kerala story : ३२ हजार महिलांच्या धर्मांतरणाचा आकडा वस्तुस्थितीला धरूनच!

चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

Google News Follow

Related

‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या केंद्रस्थानी आहे. केरळमधील ३२ हजार महिलांना इस्लाम धर्म स्वीकारून सीरियाला पाठवण्यात आल्याच्या चित्रपट दिग्दर्शकाच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण ‘केरळमधील सुमारे ३२ हजार महिला बेपत्ता होण्यामागील सत्य’ असा दावा चित्रपट दिग्दर्शकाने केला आहे आणि हा आकडा वस्तुस्थितीवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटात सांगण्यात आलेली ३२ हजार ही संख्या अवास्तव वाटत असली तरी ती वस्तुस्थितीला धरून असल्याचे सांगितले. ‘संख्या खरोखर महत्त्वाची आहे का? जर केवळ एका मुलीचेही धर्मांतर होत असेल, तर ही गोष्ट लोकांना सांगितली पाहिजे. ३२ हजार हा आकडा एक अवास्तव संख्या वाटत असली त्याला तथ्याची बाजू आहे,’ असे सेन म्हणाले.

केरळचे माजी मुख्यमंत्री उमेन चंडी हेदेखील धर्मांतराबद्दल बोलले आहेत. ते सांगतात की, २०१४ मध्ये ९०० मुलींचे धर्मांतर झाले. त्यानंतर २०१५, २०१६मध्ये आमच्याजवळ ठोस आकडेवारी नव्हती. आम्ही परत मोजणी केली आणि त्यानंतरच्या वर्षांची संख्याही जोडली आणि आम्ही ढोबळ आराखडा मांडला. परंतु केरळमधील लोकांच्या मते ही संख्या ५० हजारांहून अधिक आहे.

बेपत्ता झालेल्या महिलांची आकडेवारी मिळविण्यासाठी दिग्दर्शक सेन यांनी केरळ सरकारकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना एक बनावट वेबसाइट लिंक देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला.
‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटावर केरळमध्ये तीव्र विरोध होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केरळमधील सीपीआय(एम) आणि काँग्रेसने या चित्रपटावर जोरदार टीका केली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा समाजात विष पसरवण्याचा परवाना नाही आणि हा चित्रपट राज्यातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

शेतकऱ्याने एकाच झाडावर भरवले विविध जातीच्या १४ आंब्यांचे ‘संमेलन’

तुकाराम मुंढे, करीर, म्हैसकर यांच्याकडे आता ‘या’ जबाबदाऱ्या

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ‘द केरळा स्टोरी’च्या निर्मात्यांवर ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करून राज्याला धार्मिक कठोरवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याचा संघ परिवाराचे प्रचारतंत्र असल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, केरळमधील ३२हजार महिलांचे धर्मांतर होऊन त्या ‘इस्लामिक स्टेट’च्या सदस्य झाल्या आहेत, असा दावा केला आहे. ही बोगस कथा संघ परिवाराच्या खोट्या कारखान्याची निर्मिती आहे,’ असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा