30 C
Mumbai
Thursday, June 1, 2023
घरराजकारणसंजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांची तुलना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत केली आहे. यावरून भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेबांनी केलेल्या अखेरच्या जय महाराष्ट्राचे कारण काय होते? याचा उल्लेख संजय राऊतांनी करायला हवा. तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळेचं बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला होता. संजय राऊत हे घराघरांमध्ये भांडण लावायचं काम करत आहेत. संजय राऊतांना घरात घेतलं की घरात भांडण लावण्यावरचं संजय राऊतांची रोजीरोटी चालते. ठाकरे कुटुंबीयांमध्ये भांडण लावून झाल्यानंतर आता हेच काम ते सध्या पवार कुटुंबियांसोबत करत आहेत. त्यांनी पहिले बाळासाहेबांचे घर तोडलं आणि नंतर अजित पवारांबद्दल विरोधी भूमिका घेतली, अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

संजय राऊतांना पवार कुटुंबियांबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी आग लावायला का जायचं? संजय राऊत हे आधुनिक शकुनीमामा आहेत का? असे खोचक सवाल नितेश राणे यांनी संजय राऊतांना विचारले आहेत. मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत संजय राऊत यांनी सतत अजित पवारांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत मंचावर अजित पवारांकडे पाहतही नव्हते आणि भाषण करताना मात्र अचानक अजित पवारांचे गोडवे जाऊ लागले. संजय राऊत हे शकुनी मामापेक्षाही कपटी असल्याची घाणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे. यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा होता असं म्हणायची वेळ आली आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

वज्रमूठ सभेत अजित पवारांना मुख्य पोडियम न देणं हा संजय राऊतांचा मनसुबा होता. संजय राऊतांचे घाणेरडे राजकारण तिथेही सुरू होते, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत

मुंबईच्या सर्वच लोकल होणार गारेगार

संजय राऊत हे जाणूनबुजून मोहित कंबोज यांच्यावर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची प्रकरणे बाहेर यावीत अशी संजय राऊतांची इच्छा आहे. संजय राऊतांचं म्हणेज असं आहे की सामना मधून पगार घ्यायचा आणि पवारांकडून बोनसचा चेक घ्यायचा, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. सामना वृत्तपत्राचे संपादक पद न मिळाल्याने संजय राऊतांचा ठाकरे कुटुंबियांवर राग आहे, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
75,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा