33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरविशेष‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत

‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत

‘गो फर्स्ट’ विमान कंपनीने दिल्लीतील, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) समोर ऐच्छिक दिवाळखोरी निवारण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला.

Google News Follow

Related

‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीने मंगळवारी दिल्लीतील, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) समोर ऐच्छिक दिवाळखोरी निवारण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांनी विमान कंपनीला इंजिन पुरवणाऱ्या ‘प्रॅट अँड व्हाइटनी’ या कंपनीला जबाबदार ठरवले आहे.‘

आता आम्ही आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे,’ असे गो फर्स्ट एअरलाइनने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘प्रॅट अँड व्हाइटनी इंटरनॅशल ऍरो इंजिन कंपनीने पुरवलेल्या निकामी इंजिनांच्या वाढत्या संख्येमुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

आर्थिक निधीची गंभीर चणचण असल्यामुळे गो एअरलाइन्सने पुढील तीन दिवस म्हणजे ३, ४ आणि ५ रोजीची त्यांची सर्व विमानसेवा स्थगित केली आहे.

हे ही वाचा:

समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा

प्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास

‘गो एअरलाइन्स’चे निवेदन

गो एअरलाइन्स (इंडिया) लिमिटेड (गो फर्स्ट) या भारतातील तिसऱ्या, सर्वांत मोठ्या एअरलाइनने आज दिवाळखोरी संहितेच्या कलम १० अंतर्गत निवारणासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादा (एनसीएलटी)कडे अर्ज दाखल केला. प्रॅट अँड व्हाइटनी इंटरनॅशनल ऍरो इंजिन्स कंपनीने पुरवलेल्या निकामी इंजिनांच्या वाढत्या संख्येमुळे १ मे २०२३ पर्यंत गो फर्स्टची २५ विमाने जमिनीवर आहेत. या कंपनीने नादुरुस्त इंजिन पुरवल्यामुळे आमची विमाने उड्डाण करू शकली नाहीत. डिसेंबर २०१९ मध्ये सात टक्के विमाने उडू शकली नव्हती, हेच प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये ३१ टक्क्यांवर गेले. तर, डिसेंबर २०२२ मध्ये हेच प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले. याबाबत ही कंपनी सातत्याने नवनवी आश्वासने देत राहिली, मात्र त्यांनी ती कधीही पूर्ण केली नाहीत, असेही कंपनीने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा