34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेष११० वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट झाला होता प्रदर्शित! चित्रपटाबद्दल 'या' रंजक गोष्टी...

११० वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट झाला होता प्रदर्शित! चित्रपटाबद्दल ‘या’ रंजक गोष्टी जाणून घ्या

३ मे रोजी ११० वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) प्रदर्शित

Google News Follow

Related

भारतीय चित्रपटसृष्टीला आज ११० वर्षे पूर्ण झाली आहेत, असं म्हणता येईल. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली असे मानले जाते.

दादासाहेब फाळके यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर संपूर्ण जगभरात भारताला एक नवी ओळख मिळवून दिली. आजच्याच दिवशी म्हणजे ३ मे रोजी ११० वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) प्रदर्शित झाला होता.

पहिल्या भारतीय चित्रपटाबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

  • २१ एप्रिल १९१३ ला मुंबईतील ऑलिम्पिया थिएटर मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचा प्रिमीयर झाला होता.
  • ३ मे १९१३ ला चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता.
  • दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटाचे दिग्दर्शन केले होते.
  • चित्रपटात कहाणी हावभाव करत सांगण्यात आली होती.
  • चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी एका स्त्रीच्या शोधात दादासाहेब रेड लाईट क्षेत्रात देखील गेले होते. मात्र, त्यांना अभिनेत्री भेटली नाही.
  • चित्रपटात तारामती नावाच्या राणीची भूमिका ही अण्णा साळुंके यांनी साकारली होती.
  • चित्रपटात हरिश्चंद्राची भूमिका ही डी डी डाबके यांनी साकारली होती.
  • चित्रपटात एकही स्त्री कलाकार नव्हती.
  • चित्रपटाचे बजेट हे १५ हजार रुपये होते.
  • चित्रपटासाठी दादासाहेब फाळके यांनी सर्व मिळकत पणाला लावली होती.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती

समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा

प्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा