28 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरविशेषअबब!! ‘KGF- Chapter 2’ची केवढी ही कमाई

अबब!! ‘KGF- Chapter 2’ची केवढी ही कमाई

Google News Follow

Related

चित्रपट सृष्टीत सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चलती असून पहिले ‘पुष्पा- द राइज’, ‘RRR’ आणि आता ‘KGF- Chapter 2’ यांनी बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचले. दाक्षिणात्य अभिनेता यश याचा ‘KGF- Chapter 2’ हा चित्रपट गुरुवार, १५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त, मालविका अविनाश, श्रीनिधी शेट्टी आणि रविना टंडन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

तरण आदर्श यांनी ट्वीट करून ‘KGF- Chapter 2’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ‘KGF- Chapter 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून ५३.९५ कोटींची कमाई करून ‘वॉर’, ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटांचे पहिल्या दिवसाच्या कमाईचे विक्रम तोडले आहेत. ‘वॉर’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी ५१.६० कोटींची कमाई केली तर, ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने ५०.७५ कोटींची कमाई केली होती.

हे ही वाचा:

सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले …..

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

‘KGF- Chapter 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित ‘KGF- Chapter 2’ हा चित्रपट देश- विदेशात १० हजार पेक्षा अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. २०१८ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा हा सिक्वेल असून या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात २५० कोटींची कमाई केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा