27 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरविशेषमालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!

मालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात घडला प्रकार

Google News Follow

Related

मालदीवच्या संसदेत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात हाणामारीची घटना घडली. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी कॅबिनेटच्या मंजुरीसाठी विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र या दरम्यान खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे खासदार एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते.

मालदीवच्या संसदेत सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी), प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) आणि विरोधी पक्ष मालदिवीयन डेमोक्रेटिक पक्ष (एमडीपी) च्या खासदारांमध्ये हाणामारी झाली. एका स्थानिक वृत्तवाहिनीने जाहीर केलेल्या व्हिडीओत खासदार एकमेकांना कशी मारहाण करत आहेत, हे दिसून येत आहे. हे खासदार एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत.

हे ही वाचा:

फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

‘ऍनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर, आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!

इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!

तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

तसेच, एका खासदाराला जमिनीवर आपटण्यात आले आहे. त्याच्या मानेवर दुसऱ्या खासदाराने पाय दिला आहे. एकमेकांचे केसही खेचले जात आहे. एकजण लोकसभाध्यक्षांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानात एक वाद्य वाजवत आहेत आणि लोकसभाध्यक्ष स्वतःचे कान बंद करत आहेत, असे दृश्यही दिसत आहे. हे होत असताना बाकीचे खासदार दोघांना रोखत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

का झाली हाणामारी?
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या खासदारांना सत्ताधारी पक्षासाठी बनवण्यात आलेल्या चेंबरमध्ये जाण्यापासून रोखले होते. संसदेत सर्वाधिक खासदार असलेल्या मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीने मुइज्जू कॅबिनेटच्या चार खासदारांना मंजुरी देण्यास विरोध केला. पीएनसी आणि पीपीएम पक्षांनी या संघर्षासाठी एमडीपीला जबाबदार ठरवले. त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा