28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषबेंगळुरूला हरवून कोलकाता दुसऱ्या स्थानी; चेन्नई अव्वल

बेंगळुरूला हरवून कोलकाता दुसऱ्या स्थानी; चेन्नई अव्वल

Google News Follow

Related

कोलकात्याने बेंगळुरूला सात विकेटने पराभूत केल्यानंतर आयपीएल २०२४च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय आहे. कोलकात्याने याआधी हैदराबादला चार धावांनी पराभूत केले होते. तर, अव्वल स्थानी चेन्नई आहे. चेन्नईची धावगतीही अन्य संघांपेक्षा अधिक आहे. तर, बेंगळुरूचा संघ दुसऱ्या पराभवानंतर सहाव्या क्रमांकावर आहे.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने यंदाच्या आयपीएल हंगामात घरच्या मैदानात होणाऱ्या सामन्यांमध्ये संघाच्या विजयी परंपराही मोडित काढली आहे. बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामन्यापूर्वी आयपीएल २०२४मध्ये एकूण नऊ सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्या त्या शहरातील संघाने बाजी मारली आहे. मात्र कोलकात्याने बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर चितपट करून ही परंपरा मोडली आहे.

कोलकाताच्या खात्यात चार गुण आहेत. त्यांची धावगती +१.०४७ आहे. तर, चेन्नईच्या खात्यातही चार गुणच असले तरी त्यांची धावगती +१.९७९ आहे. धावगती अधिक असल्याने ते अव्वल स्थानी आहेत. राजस्थानचा संघ चार गुणांनिशी आणि +०.८०० धावगतीसह तिसऱ्या स्थानी तर हैदराबादचा संघ दोन गुण आणि +०.६७५ धावगतीसह चौथ्या स्थानी आहे. पंजाबच्या खात्यात दोन गुण जमा असून त्यांची धावगती +०.०२५आहे. ते पाचव्या स्थानी आहेत.\

हेही वाचा :

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

तर, बेंगळुरूचा संघ दोन गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यांची धावगती उणे ०.७११ आहे. तर, गुजरातचा संघ दोन गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्यांची धावगती उणे १.४२५ आहे. दिल्ली आणि मुंबईच्या संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. मात्र दिल्लीची धावगती उणे ०.५२८ असल्याने ते आठव्या स्थानी तर, मुंबईची धावगती उणे ०.९२५ असल्याने ते नवव्या स्थानी आहेत. तर, लखनऊचा संघ उणे १.००० धावगतीसह तळाला आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा