29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषइंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

Google News Follow

Related

आता चीनलाही पाकिस्तानमध्ये स्वतःच्या सुरक्षेची चिंता भेडसावू लागली असल्याचे दिसत आहे. चिनी कंत्राटदारांनी पाकिस्तानमध्ये दासू आणि डायमर बाशा धरणाचे काम थांबवले आहे. या आठवड्यात चिनी इंजिनीअर व पाकिस्तान चालक असणाऱ्या गाडीवर आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चिनी कंपनीने धरणाचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील विविध प्रकल्पांवर चीनमधील सुमारे १२५० कर्मचारी काम करतात.

भारताशी संबंध बिघडल्यानंतर सातत्याने चीन पाकिस्तानच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. चीनने पाकिस्तानच्या विविध आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र आता येथील विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होऊ लागली आहे. अशा प्रकारे हल्ले झाल्यास दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम संपूर्ण पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांवरही होऊ शकतो.

हेही वाचा :

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

मुंबईकरांनो रेल्वेने रविवारी प्रवास करताय? मग लक्षात ठेवा…

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आरोप
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देशातील दहशतवाद मिटवण्यासाठी अफगाणिस्तानचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानवरील धोका कमी करण्यासाठी तालिबान सरकारने सीमेवर अधिक कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानने अफगाणिस्तानला दोषी ठरवले आहे. हे हल्ले तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केल्याचा त्यांचा आरोप आहे. ‘दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या संख्येने बदल होण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा स्रोत अफगाणिस्तानच आहे,’ असा आरोप ख्वाजा यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा