32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषलखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!

लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!

हर्षित-वरुणच्या फिरकीपुढे लखनऊचे फलंदाज गारद

Google News Follow

Related

कोलकात्याने लखनऊचा ९८ धावांनी पराभव केला. नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताने सुनील नारायणच्या तुफान खेळीच्या जोरावर २० षटकांत सहा विकेट गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल लखनऊचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांवरच गारद झाला.या विजयामुळे कोलकात्याचा संघ गुणतक्त्यात १६ गुणांनिशी पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, लखनऊचा नेट रनरेट -०.३७१ झाला असून संघाची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनऊचा पुढचा सामना आता ८ मे रोजी हैदराबादविरोधात होईल. तर, कोलकात्याचा पुढील सामना ११ मे रोजी मुंबईविरोधात होईल.

२३६ धावांचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला फटका धावफलक २०वर असताना बसला. अर्शिन कुलकर्णी याला मिचेल स्टार्कने बाद केले. तो केवळ नऊ धावा करू शकला. तर, संघाला दुसरा फटका केएल राहुलच्या रूपात बसला. तो अवघ्या २५ धावा करून परतला. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसशिवाय कोणताही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. मार्कसने चार चौकार व दोन षटकारांसह ३६ धावांची खेळी केली.

कोलकात्याविरोधात दीपक हुड्डाने पाच, निकोलस पूरनने १०, आयष बडोनीने १५, टर्नरने १६, क्रुणाल पांड्याने पाच, युद्धवीर सिंहने सात, रवि बिश्नोईने दोन धावा केल्या. तर, नवीन-उल-हक एकही धाव न घेता नाबाद राहिला. कोलकात्यासाठी हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय रसेलने दोन आणि मिचेल स्टार्क व सुनील नारायणने प्रत्येकी एक विकेट घेतली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या कोलकात्याने २० षटकांत सहा विकेट गमावून २३५ धावा केल्या.

हे ही वाचा:

पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात

पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा!

गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात

या मैदानावर ही टी-२०चा सर्वाधिक धावसंख्या ठरली.कोलकात्याची सुरुवात दमदार झआली. सुनील नारायण आणि फिल सॉल्टच्या दरम्यान पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली. ही जोडी नवीन-उल-हकने फोडली. त्याने सॉल्टला बाद केले. सॉल्ट ३२ धावा करून बाद झाला. तर, नारायणने सहा चौकार व सात षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. तर, आंद्रे रसेलची विकेट नवीन-उल-हकने घेतली.

तो केवळ १२ धावाच करू शकला. त्यानंतर युद्धवीर सिंहने अंगकृष रघुवंशीला लक्ष्य केले. त्याने २६ चेंडूंत ३२ धावा केल्या. रिंकू सिंहने १६, श्रेयस अय्यरने २३, रमणदीप सिंहने २५ आणि व्यंकटेश अय्यरने एक धाव केली. रमणदीप और व्यंकटेश नाबाद राहिले. लखनऊच्या नवीन-उल-हकने तीन विकेट घेतल्या. तर, यश ठाकुर, रवि बिश्नोई और युद्धवीर सिंह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा