30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामाझारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

छापेमारीत मोठी रोकड जप्त

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा अधिक अलर्ट मोडवर आल्या असून अमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीकडून झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त केली आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

झारखंडमध्ये ईडीकडून कारवाई सुरू आहे. अशातच ईडीच्या छापेमारीत मोठी रोकड जप्त करण्यात आली. झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल यांच्या सहायकाकडून रोकड जप्त केल्याची ईडीची माहिती मिळत आहे. यावेळी तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या २० कोटी रुपयांची मोजणी करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असून पैसे मोजण्यासाठी काही मशीन्स मागवण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी ईडीने अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीनं फेब्रुवारी २०२३ मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के यांच्यावर काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ईडीच्या वतीनं झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड काळ्या पैशाचा भाग असल्याचं ईडीचं मत आहे.

हे ही वाचा:

‘मला काँग्रेसच्या कार्यालयातील खोलीत बंद केले’

पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात

पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा!

आलमगीर आलम हे पाकूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच सध्या ते झारखंड सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. तसेच २००६ ते २००९ या दरम्यान ते झारखंड विधानसभेचे अध्यक्षही होते. आलमगीर आलम हे चारवेळा आमदर म्हणून निवडून आलेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा