33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषट्विटरच्या दुटप्पीपणाचा 'कू' ला फायदा

ट्विटरच्या दुटप्पीपणाचा ‘कू’ ला फायदा

Google News Follow

Related

“शेतकरी आंदोलनाशी संबंधित काही अकाउंटवर बंदी घालावी असा केंद्र सरकारने आदेश दिला असतानाही ट्विटरने तसे करायला नकार दिला होता. त्यावरुन आता ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट कू वर अकाउंट उघडले. त्यानंतर कू च्या डाऊनलोडमध्ये वाढ झाली असून पाच दिवसात तब्बल नऊ लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे.

कू हा एक ट्विटर प्रमाणेच, पण स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वेबसाइटवर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात २६ लाख लोकांनी कू ऍप इन्स्टॉल केले आहे. परंतु हैराण करणारी गोष्ट म्हणजे ६ ते ११ फेब्रुवारी दरम्यान म्हणजे पाच दिवसात नऊ लाखांपेक्षा जास्त वेळा कू इन्स्टॉल करण्यात आले.

हे ही वाचा:

दुटप्पी ट्विटरला भारतीय ‘कू’ची टक्कर

ट्विटरला आता कू हा स्वदेशी प्लॅटफॉर्म पर्याय ठरतोय का?  किंवा केंद्र सरकार ट्विटरला पर्याय देण्याचा प्रयत्न करतंय का? अशी चर्चा सुरु आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि अनेक मंत्र्यांनी कू ऍप वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेकांनी कू ऍप्पच्या समर्थनाथ ट्वीट केले आहे. जसा टीवटीव करणारा निळा पक्षी ट्विटरचा लोगो आहे त्याप्रमाणे कूकू करणारा पिवळा पक्षी कू चा लोगो आहे.

ट्विटरप्रमाणे यावरही आपण आपले विचार मांडू शकतो. यात आपले मत मांडण्यासाठी 400 शब्दांची मर्यादा आहे. इथेही आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण फॉलो करु शकतो. कू या ऍपचा विकास बॉम्बीनेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या बंगळुरुतील कंपनीने केला आहे. याची सुरुवात २०१५ साली करण्यात आली आहे. कू ने केंद्र सरकारचा आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज पुरस्कार जिंकला आहे. या ऍपच्या निर्मात्याचे नाव अप्रमेय राधाकृष्ण असे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा