35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरविशेष'डी' गँगची जमीन नवाब मलिकांच्या कंपनीच्या नियंत्रणात!

‘डी’ गँगची जमीन नवाब मलिकांच्या कंपनीच्या नियंत्रणात!

Google News Follow

Related

ईडीचे वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद

महाविकास आघाडीतील कॅबेनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केल्यानंतर जेेजे रूग्णालयात वैद्यकीय चाचणीनंतर तपासअधिकारी रिमांडसाठी त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष #PMLA कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथम ईडीचे वकील अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

त्याआधी, मलिक यांना न्यायालयात का आणण्यास उशीर का असा संतप्त सवाल न्यायाधीश राहुल रोकडे यांनी केला. ते म्हणाले की, “आरोपीला कोर्टात आणायला इतका वेळ का लागतोय?” तेव्हा अनिल सिंग म्हणाले की, “माझे सहकारी खाली गेलेत, ते देखील हीच बाब तपासत आहेत”

नवाब मलिकांना नंतर कोर्टात हजर केले गेले. तेव्हा ते म्हणाले की, मला कोणतीही माहिती न देता सकाळीच अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणले, तिथे गेल्यावर समन्सवर सही घेतली. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही.

नंतर ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांचा युक्तिवाद सुरू झाला.ते म्हणाले, दाऊदबद्दल काही वेगळे सांगायला नको. तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. दाऊदने अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती विकत घेतली आहे. त्याची बहीण हसिना पारकर ही त्याची इथली मुख्य हस्तक होती. तिच्या माध्यमातून मोठी संपत्ती गोळा केली. कुर्ला येथील एक विवादित संपत्ती ही मुळातच ‘डी’ गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ती संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिकांसाठी १४ दिवसांची कोठडी मागितली.

हे ही वाचा:

नवाब मलिक यांच्या अटकेच्या आदेशात म्हटलंय तरी काय?

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता; राष्ट्रवादीची होणार बैठक

ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?

ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 

नवाब मलिकांतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अमित देसाईंचा युक्तिवाद सुरू झाला. आरोपीकडून काहीही हस्तगत करण्यात आलेलं नाही, बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले. २० वर्षांनी हे प्रकरण उकरून काढले जात आहे. कोणताही पुरावा नाही, केवळ काही माहितीच्या आधारे अटक करण्यात आले आहे. आणि न्यायव्यवस्थेला त्रास नको म्हणून थेट १४ दिवसांची पोलीस कस्टडी मागितली जातेय?, देसाईंनी युक्तिवाद केला. जे काही पुरावे उपलब्ध आहेत ते याप्रकरणातील सहआरोपींबाबत उपलब्ध आहेत. त्यांच्याशी नवाब मलिकांचं काहीही देणघेणं नाही. त्यांना ताब्यात घेऊन ईडीनं खुशाल आपला तपास करावा, असे अमित देसाई म्हणाले.

आरोपींच्या पिंज-यात बराच वेळ उभे केलेल्या नवाब मलिकांना पिंज-यातच बसण्यासाठी कोर्टाकडून खुर्ची दिली गेली. नवाब मलिकांची मुलगी आणि जावई समीर खान यांच्यासह अन्य काही कुटुंबियही कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा